What India Thinks Today | आज AI वर चर्चा, कृषी, फिल्म आणि जीव-विज्ञानावर AI मुळे काय होणार परिणाम?
टीवी 9 नेटवर्कचे वार्षिक फ्लॅगशिप कॉन्क्लेव, व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समिट 2024 ची सुरुवात 25 फेब्रुवारीला झालीय. आज म्हणजे 26 फेब्रुवारीला या समिटमध्ये AI द प्रॉमिस अँड पिटफॉल्स सेशनच आयोजन करण्यात आलय. यात आर्टिफिशियल इंटेलिजेंसच भविष्य आणि त्याचा वापर यावर दिग्गज आपल म्हणण मांडतील. हे सेशन सकाळी 10.35 वाजता सुरु होईल.

What India Thinks Today Global Summit : टीवी9 नेटवर्कचा व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समिटच हे दुसर वर्ष आहे. आपपाल्या क्षेत्रातील दिग्गज या मंचावर आपल मत मांडतायत. व्हॉट इंडिया थिंक्स टुडेमध्ये आज सकाळी 10.35 वाजता आर्टिफिशियल इंटेलिजेंस या विषयावर रिलायन्स जियोचे चीफ डेटा साइंटिस्ट डॉ. शैलेश कुमार, सॅमसंग AI विजनचे डायरेक्टर आलोक शुक्ला आणि स्टॅनफोर्ड यूनिवर्सिटीचे प्रोफेसर डॉ. अनुराग मैराल, MARZ चे सीईओ जोनाथन ब्रॉन्फमॅन आणि मायक्रोसॉफ्टचे समिक रॉय आपल म्हणण मांडतील.
व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समिट मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मंत्री, फिल्म, अर्थशास्त्र, स्वास्थ्य, संस्कृती आणि क्रीडा जगतातून तज्ज्ञ व्यक्ती सहभागी होतील. व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समिटची सुरुवात 25 फेब्रुवारीला नवी दिल्लीच्या सम्राट अशोक हॉटलमध्ये झाली होती. यात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर, फिल्म डायरेक्टर शेखर कपूर, अभिनेत्री रवीना टंडन आणि माजी बॅडमिंटन खेळाडू आणि विद्यमान नॅशनल कोच पुलेला गोपीचंद सहभागी झाले होते.
जोनाथन ब्रॉन्फमॅन : सीईओ, MARZ
जोनाथन कॅनडाचे फिल्म प्रोड्यूसर आहेत. त्यांनी द बर्निंग सीज़न, द बॉय इन द वुड्स, माई एनिमल आणि द विच सारख्या हॉलीवुड फिल्मसची निर्मिती केली आहे. जोनाथन व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समिटमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि वीएफएक्स यूजवर चर्चा करतील.
समिक रॉय : एग्जीक्यूटिव डायरेक्टर, मायक्रोसॉफ्ट इंडिया
व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समिटमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस सेशनमध्ये समिक रॉय सहभागी होतील. समिक या सेशनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा कॉर्पोरेटमध्ये कसा वापर करायचा, यावर चर्चा करतील. सोबतचत आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या वापराने कसं परिवर्तन आणता येईल याबद्दलही बोलतील.
डॉ. अनुराग मेराल : स्टॅनफोर्ड प्रोफेसर, स्पेशलायजेशन AI
डॉक्टर अनुराग स्टॅनफोर्ड यूनिवर्सिटीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि बायो टेक्नोलॉजीचे प्रतिष्ठित प्रोफेसर आहेत. कृषी क्षेत्रातील आर्टिफिशियल इंटेलिजेंसवर बोलतील. AI कडून शेतकऱ्यांना योग्यवेळी खतं, कीटनाशक आणि सिंचनात मदत मिळू शकते. पिकांच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा होऊ शकते.
आलोक शुक्ला : डायरेक्टर AI विजन, सॅमसंग रिसर्च
आलोक शुक्ला कॅमरा टेक्नोलॉजीमध्ये AI च्या वापराबद्दल बोलतात. आलोक भविष्यात मोबाइल टेक्नोलॉजी आणि त्यात AI च्या वापराबद्दल व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समिटमध्ये बोलतील.
डॉ. शैलेश कुमार : चीफ डेटा साइंटिस्ट रिलायंस जियो
डॉक्टर शैलेश कुमार सध्या रिलायन्स जियोचे आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि मशीन लर्निंगचे चीफ डेटा सायटिस्ट आहेत. रिलायन्स जियो त्यांच्या नेतृत्वाखाली आपला आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि मशीन लर्निंग प्रोग्राम डेवलप करत आहे. डॉ. शैलेश कुमार व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समिटमध्ये चॅट जीपीटीला टक्कर देण्यासाठी रिलायन्सचा BharatGPT कधी लॉन्च होईल, या बद्दल माहिती देतील.
