AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

I LOVE MOHAMMAD काय आहे? त्यावरुन देशात इतका वाद का होतोय? महाराष्ट्रात कुठे निघालेला मोर्चा?

I LOVE MOHAMMAD : अचानक काही लोकांनी I Love मोहम्मद लिहिलेला बॅनर हाती घेऊन रॅली काढली. प्रशासनाकडून कुठलीही परवानगी घेतली नव्हती. पोलिसांना या बद्दल काही माहित नव्हतं. बघता, बघात जमाव वाढत गेला आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.

I LOVE MOHAMMAD काय आहे? त्यावरुन देशात इतका वाद का होतोय? महाराष्ट्रात कुठे निघालेला मोर्चा?
I LOVE MOHAMMAD
| Edited By: | Updated on: Sep 29, 2025 | 10:23 PM
Share

कानपुरमधून सुरु झालेला हा वाद आता देशाच्या दुसऱ्या शहरात पोहोचला आहे. तिथून येणारे फोटो चिंताजनक आहेत. मुस्लिम समाज रागात आहे आणि हातात ‘I LOVE MOHAMMAD’ चे फलक घेऊन प्रदर्शन करत आहेत. अनेक विरोध प्रदर्शना दरम्यान लोकांनी कायदा आपल्या हातात घेतला. पोलिसांसोबत वादावादी,धक्काबुक्की झाली. पोलिसांना पळवलं त्यांच्या युनिफॉर्मवर लावलेले स्टार सुद्धा खेचून काढले.

4 सप्टेंबर रोजी यूपीच्या कानपुरमध्ये एक पोस्टर लावलेला. त्यावर लिहिलेलं I LOVE MOHAMMAD. या पोस्टरला हिंदू संघटनांनी विरोध केला. त्यानंतर यूपी पोलिसांनी कारवाई करत 25 युवकांविरोधात गुन्हा नोंदवला. यामुळे मुस्लिम समाज भडकला आणि अनेक शहरात विरोध प्रदर्शन सुरु झालं. कुठल्या कटाअंतर्गत हे विरोध प्रदर्शन सुरु आहे का? हा प्रश्न आहे.

काशीपुरमध्ये काय घडलं?

कानपुरपासून सुरु झालेला हा वाद आता देशाच्या दुसऱ्या शहरात पोहोचला आहे. उत्तराखंडच्या काशीपुरमध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. विनापरवानगी निघालेल्या मिरवणुकीमुळे शहरात दंगली सारखी स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. दगडफेक, तोडफोड आणि पोलिसांवर हल्ला सुद्धा झाला. पण पोलिसांनी लगेच कारवाई करुन परिस्थिती नियंत्रणात आणली. काशीपूरच्या अलीखान भागात अचानक काही लोकांनी I Love मोहम्मद लिहिलेला बॅनर हाती घेऊन मिरवणूक काढली. प्रशासनाकडून कुठलीही परवानगी घेतली नव्हती. पोलिसांना या बद्दल काही माहित नव्हतं. बघता, बघात जमाव वाढत गेला आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. दगडफेक, धक्काबुक्की आणि पोलिसांना मारहाणीपर्यंत परिस्थिती चिघळली.

महाराष्ट्रात कुठे निघाली रॅली?

महाराष्ट्राच्या लातूरमधून हैराण करणारं चित्र समोर आलं. लातूरमध्ये मुस्लिम समुदायाकडून I Love मोहम्मदच्या घोषणा देत एक भव्य रॅली काढण्यात आली. ही रॅली गंज गोलाई येथून सुरु होऊन टाऊन हॉल पर्यंत पोहोचली. रॅली दरम्यान भावना खूप तीव्र होत्या. जागो जागी मुस्लिम समाजाचे लोक मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी होत होते. पाहता, पाहता हजारोंची संख्या लाखोंमध्ये बदलली. या रॅलीमध्ये यूपी सरकार मुर्दाबादच्या सुद्धा घोषणा देण्यात आल्या. प्रशासनाकडून सुरक्षेची काटेकोर व्यवस्था करण्यात आलेली. जमावाला नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस प्रत्येक ठिकाणी तैनात होते. लातूरमध्ये ही रॅली शांततापूर्ण राहिली पण घोषणाबाजीमुळे वातावरण गरम झालेलं. मात्र नंतर तणाव निवळला.

महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.