सुप्रिया सुळे की प्रफुल्ल पटेल दोघांपैकी कोण होणार अध्यक्ष? शरद पवार यांनी स्पष्टच सांगितले

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून शरद पवार यांनी शनिवारी सकाळी महत्वाची घोषणा केली. पक्षात सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. आता या दोघांपैकी कोण अध्यक्ष होणार? याचे उत्तर पवार यांनी दिले आहे.

सुप्रिया सुळे की प्रफुल्ल पटेल दोघांपैकी कोण होणार अध्यक्ष? शरद पवार यांनी स्पष्टच सांगितले
Follow us
| Updated on: Jun 10, 2023 | 5:41 PM

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यानंतर या विषयावर शनिवारी संध्याकाळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दोन कार्यकारी अध्यक्ष का नेमले? या संदर्भात भूमिका मांडली. दोघांपैकी कोण अध्यक्ष होणार? यासंदर्भात शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली. महाराष्ट्राची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्यांकडे दिली. यामुळे अजित पवार नाराज झाले का? ही चर्चा सुरु झाली आहे. त्यावर शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली.

का नेमले दोन अध्यक्ष

देशातील व्याप पाहिल्यावर एका व्यक्तींकडून देश सांभाळला जाणे अशक्य होते. निवडणुकीसाठी आता वर्षभरापेक्षा कमी कलावधी आहे. यामुळे वर्षभरात आम्ही एका व्यक्तीकडून सर्व ठिकाणी पोहचू शकलो नसतो. त्यामुळे दोन अध्यक्ष नेमले गेले आहे.  एका कार्यकारी अध्यक्षाला चार ते सहा राज्य देण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून २०२४ मध्ये देशातील अनेक राज्यांमध्ये पक्ष पोहचणार आहे. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना का जबाबदारी दिली? यावर बोलताना लोकांची मागणी होती. त्यानुसार या लोकांवर जबाबदारी दिली, असे पवार यांनी स्पष्ट केले.

भविष्यात कोण होणार अध्यक्ष

भविष्यात सुप्रिया सुळे की प्रफुल्ल पटेल या दोघांपैकी कोण अध्यक्ष होणार? या प्रश्नावर बोलताना शरद पवार यांनी आपली भूमिका एका वाक्यात मांडली. पवार म्हणाले की, सध्या अध्यक्षपद रिक्त नाही. हे पद रिक्त झाल्यावर त्यासंदर्भात विचार केला जाईल.

अजित पवार नाराज नाही

अजित पवार नाराज नाही. राज्यात त्यांच्यांकडे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी दिली आहे. त्यांच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या असल्याची माहिती शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रत्येक सहकाऱ्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे जबाबदारी नसल्याने लोकांच्या आग्रहाने त्यांच्यावर नवीन जबाबदारी देण्यात आल्याची माहिती पवार यांनी दिली. सुप्रिया सुळे या लोकसभेत पक्षाचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्या लोकसभेतील अनुभवाचा फायदा पक्षाला होईल. तसेच दिल्लीजवळच्या राज्यांमध्ये त्याचा फायदा होईल.

अजित पवार यांनीच सुप्रिया सुळे यांचे नाव सुचविले. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याच्या वृत्ताला अर्थ नाही, असे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. सुप्रिया सुळे यांची निवड हा माझ्या एकट्याचा निर्णय नाही. गेल्या एक महिन्यापासून याविषयीची चर्चा पक्षातील सहकाऱ्यांमध्ये सुरु होती, असे पवार यांनी स्पष्ट केले.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.