नाकाद्वारे देण्यात येणारी जगातील पहिली लस झाली उपलब्ध, पाहा किंमत

भारत सरकारने 23 डिसेंबर रोजी या लसीला मान्यता दिली होती. सर्वप्रथम, नाकाची लस खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून दिली जाईल. खासगी रुग्णालयांमध्ये यासाठी ८०० रुपये मोजावे लागणार आहेत. या लसीचे बुकिंग फक्त Cowin पोर्टलवरून केले जाणार आहे.

नाकाद्वारे देण्यात येणारी जगातील पहिली लस झाली उपलब्ध, पाहा किंमत
नाकाद्बारे देण्यात येणारी भारत बायोटेकची लस
Follow us
| Updated on: Jan 26, 2023 | 4:58 PM

नवी दिल्ली  : नाकाद्वारे देण्यात येणारी जगातील पहिली नेझल लस ‘इनकोव्हॅक'(Nasal Covid Vaccine) आजपासून उपलब्ध झाली. भारत बायोटेकने ही लस विकसित केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया आणि केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी ही नेझल व्हॅक्सिन (Nasal Vaccine) ‘इनकोव्हॅक’ (iNCOVACC) लाँच केली आहे. हैदराबादमधील भारत बायोटेकने वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या सहकार्याने ही लस विकसित केले आहे. नाकातून देण्यात येणारी ही लस बुस्टर डोस म्हणून दिली जाणार आहे.

भारत सरकारने 23 डिसेंबर रोजी या लसीला मान्यता दिली होती. सर्वप्रथम, नाकाची लस खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून दिली जाईल. खासगी रुग्णालयांमध्ये यासाठी ८०० रुपये मोजावे लागणार आहेत. या लसीचे बुकिंग फक्त Cowin पोर्टलवरून केले जाणार आहे.

बुस्टर म्हणून मिळणार सध्या इंजेक्शनद्वारे लसीकरण केले जात आहे. या लसीला इंट्रामस्क्युलर लस म्हणतात. नाकाची लस ही नाकातून दिली जाते. तिला इंट्रानासल लस म्हणतात. म्हणजेच, ते इंजेक्शनने देण्याची गरज नाही किंवा तोंडावाटे लसीप्रमाणे दिली जात नाही. हे स्प्रेसारखे आहे. कोवॅक्सिन आणि कोविशील्ड सारख्या लस घेणाऱ्यांना इंट्रानासल लस बूस्टर डोस म्हणून दिली जाईल.

हे सुद्धा वाचा

4 थेंबही पुरेसे नेझल लस पहिली लस म्हणून देखील वापरली जाऊ शकते. भारत बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष डॉ. कृष्णा एला यांनी सांगितले की, पोलिओप्रमाणेच या लसीचे 4 थेंबही पुरेसे आहेत. दोन्ही नाकपुड्यांमध्ये दोन थेंब टाकावेत.

या नाकातील लसीला iNCOVACC असे नाव देण्यात आले आहे. यापूर्वी याचे नाव BBV154 असे होते. त्याची खास गोष्ट अशी आहे की ते शरीरात प्रवेश करताच कोरोनाचा संसर्ग आणि संक्रमण दोन्ही रोखते. ही लस इंजेक्शनने दिली जात नसल्यामुळे संसर्गाचा धोका नाही. ही लस देण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनाही विशेष प्रशिक्षणाची गरज भासणार नाही.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.