AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन बडे क्रिकेट खेळाडू लोकसभेच्या मैदानात, या पक्षाकडून उमेदवारी

Loksabha Election 2024 Yusuf Pathan and Kirti Azad: इंडिया आघाडीला धक्का देत ममता बॅनर्जी यांनी ४२ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात युसूफ पठाण आणि कीर्ती आझाद यांचे नाव आहे. पश्चिम बंगालमधील बहरामपूर येथन युसूफ पठाण तर दुर्गापूर मतदार संघातून कीर्ती आझाद यांना उमेदवारी दिली.

दोन बडे क्रिकेट खेळाडू लोकसभेच्या मैदानात, या पक्षाकडून उमेदवारी
| Updated on: Mar 10, 2024 | 3:39 PM
Share

संदीप राजगोळकर, नवी दिल्ली | दि. 10 मार्च 2024 : नेहमी क्रिकेटचे मैदान गाजवणारे खेळाडू आता लोकसभेचे मैदान गाजवणार आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने दोन बड्या क्रिकेट खेळाडूंना उमेदवारी जाहीर केली. इंडिया आघाडीला धक्का देत ममता बॅनर्जी यांनी ४२ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात युसूफ पठाण आणि कीर्ती आझाद यांचे नाव आहे. पश्चिम बंगालमधील बहरामपूर येथन युसूफ पठाण तर दुर्गापूर मतदार संघातून कीर्ती आझाद यांना उमेदवारी दिली.

युसुफ पठाणला बहरामपूरची उमेदवारी

लोकसभा निवडणुकीसाठी ममता बॅनर्जींकडून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जाहीर केले आहे. इंडिया आघाडीशी चर्चेची वाट न पाहता ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा धक्का दिला आहे. बहरामपूर लोकसभा मतदार संघातून यूसुफ पठाण यांना तिकीट दिले आहे. या ठिकाणावरुन काँग्रेसकडून दिग्गज उमेदवार अधीर रंजन चौधरी असणार आहे. त्यामुळे ही लढत चांगलीच रंगतदार होणार आहे.

कीर्ती आझाद दुर्गापूर मतदार संघातून

भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू कीर्ती आझाद दुर्गापूर मतदार संघातून तृणमूलकडून लढणार आहे. या ठिकाणी सध्या भाजपचे एस. एस. आहलूवालिया खासदार आहेत. भाजप आणि काँग्रेसने अजून आपला उमेदवार जाहीर केला नाही.

हे आहेत तृणमूलचे ४२ उमेदवार

  1. कूच बिहार (एससी)- जगदीश चंद्र बसुनिया
  2. अलीपुरद्वार (एसटी)- प्रकाश चिक बडाईक
  3. जलपाईगुड़ी (एससी)- निर्मल चौधरी रॉय
  4. दार्जिलिंग- गोपाल लामा
  5. रायगंज- कृष्णा कल्याणी
  6. बालुरघाट- बिप्लब मित्रा
  7. मालदा उत्तर- प्रसून बनर्जी
  8. मालदा दक्षिण- शाहनवाज अली रैहान
  9. जंगीपुर- खलीलुर्रहमान
  10. बरहामपूर- युसूफ पठाण
  11. मुर्शिदाबाद- अबू ताहेर खान
  12. कृष्णानगर- महुआ मोइत्रा
  13. रानाघाट (एससी)- मुकुट मणि अधिकारी
  14. बोंगांव- विश्वजीत दास
  15. बैरकपूर- पार्थ भौमिक
  16. दम दम- प्रोफेसर सौगत रॉय
  17. बारासात- काकोली घोष दस्तीदार
  18. बशीरहाट- नूरुल इस्लाम
  19. जॉयनगर (एससी)- प्रतिमा मंडल
  20. मथुरापूर (एससी)- बापी हलदर
  21. डायमंड हार्बर- अभिषेक बनर्जी
  22. जादवपूर- सायोनी घोष
  23. कोलकाता दक्षिण- माला रॉय
  24. कोलकाता उत्तर- सुदीप बंधोपाध्याय
  25. हावडा- प्रसून बनर्जी
  26. उलूबेरिया- सजदा अहमद
  27. सेरामपूर- कल्याण बनर्जी
  28. हुगली- रचना बनर्जी
  29. आरामबाग (एससी)- मिताली बाग
  30. तमलुक- देबांगशु भट्टाचार्य
  31. कंठी- उत्तम बारिक
  32. घाटल- दीपक अधिकारी (देव)
  33. झारग्राम (एसटी)- कालीपाड़ा सोरेन
  34. मेदिनीपूर- जून मालिया
  35. पुरुलिया- शांतिराम महतो
  36. बांकुरा- अरूप चक्रवर्ती
  37. बिष्णुपर (एससी)- सुजाता मंडल
  38. बर्धमान पुरबा (एससी)- डॉ शर्मिला सरकार
  39. बर्धमान दुर्गापूर- कीर्ती आजाद
  40. आसनसोल- शत्रुघ्न सिन्हा
  41. बोलपूर (एससी)- असित कुमार मल
  42. बीरभूम- शताब्दी रॉय
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.