हा खेळ सावल्यांचा ! देशातील सर्वात जास्त Haunted पाच रेल्वे स्थानकं, सूर्यास्तानंतर भुतांचा वावर ?

देशभरात ज्या पाच सर्वात जास्त Haunted रेल्वे स्थानकांची चर्चा आहे, त्या पाच रेल्वेस्थानकांबाबत माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत (most haunted railway stations in India).

हा खेळ सावल्यांचा ! देशातील सर्वात जास्त Haunted पाच रेल्वे स्थानकं, सूर्यास्तानंतर भुतांचा वावर ?
देशातील सर्वात जास्त Haunted पाच रेल्वे स्थानकं
Follow us
| Updated on: May 20, 2021 | 9:54 PM

मुंबई : आमचा तुम्हाला घाबरवण्याचा अजिबात हेतू नाही. तसेच आम्हाला कोणत्याही अंधश्रद्धेला अजिबात खतपाणी घालायचं नाही. पण देशभरात ज्या पाच सर्वात जास्त Haunted रेल्वे स्थानकांची चर्चा आहे, त्या पाच रेल्वेस्थानकांबाबत माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. या रेल्वे स्थानकांचं संध्याकाळनंतरचं वातावरण अतिशय सामसूम असतं. काही रेल्वे स्थानकांवर तर कुणाच्यातरी किंचाळण्या किंवा ओरडण्याचा देखील आवाज येतो. काही प्रवाशांना तर तिथे रात्रीच्या वेळी भयानक अनुभव आल्याच्या बऱ्याच दंतकथा अनेकांनी ऐकल्या आहेत. अर्थात त्याची पुष्टी आम्ही करत नाही. मात्र, तरीही देशातील सर्वाधिक पाच थरारक रेल्वे स्थानिकांची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत (most haunted railway stations in India).

1) बेगुनकोदर रेल्वे स्थानक

पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यातील बेगुनकोदर रेल्वे स्थानक संबंधित अनेक कथा आहेत. हे रेल्वे स्थानक देशातील सर्व रेल्वे स्थानकांपैकी भयानक आणि भीतीदायक रेल्वे स्थानकांमध्ये गनलं जातं. या रेल्वे स्थानकावर प्रवाशांना पांढऱ्या रंगाच्या साडीत एक महिला भूत दिसते, अशी कथा या रेल्वे स्थानकाची आहे. याशिवाय या रेल्वे स्थानकाशी संबंधित अनेक भीतीदायक कथा आहेत. स्टेशन परिसरात भूत असल्याच्या या दाव्यांमुळे तब्बल 42 वर्ष हे रेल्वे स्थानक बंद होतं. अखेर 2009 मध्ये हे रेल्वे स्थानक पुन्हा सुरु करण्यात आलं होतं (most haunted railway stations in India)

2) बडोग रेल्वे स्थानक

हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यात बडोग नावाचं एक छोटं आणि सुंदर असं रेल्वे स्थानक आहे. मात्र, या रेल्वे स्थानकालाही भूताचं रेल्वे स्थानक असं मानलं जाण्याचं शापित आहे. कालका-शिमला रेल्वे मार्गादरम्यान प्रवास करताना हे रेल्वे स्थानक लगतं. हे रेल्वे स्थानकही देशातील सर्वात भीतीदायक रेल्वे स्थानकांपैकी एक असल्याचं मानलं जातं. या रेल्वे स्थानकाच्या बाजूला एक गुहा आहे. हा गुहा ब्रिटिश इंजिनिअर कर्नल बडोग यांनी तयार केला होता. त्यानंतर त्यांनी आत्महत्या केली होती. या गुहेत कर्नल बडोग यांची आत्मा फिरत असते, अशी एक चर्चा आहे.

3) चित्तूर रेल्वे स्थानक

देशातील सर्वात भीतीदायक रेल्वे स्थानकांध्ये आंध्र प्रदेशच्या चित्तूर रेल्वे स्थानकाचाही समावेश होतो. रेल्वे स्थानकाच्या आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांचा दावा आहे की, या परिसरात एकदा सीआरपीएफचा एक जवान रेल्वेतून उतरला होता. त्याचं नाव हरी सिंह असं होतं. या जवानाला आरपीएफ आणि टीटीई या दोघांनी मिळून खूप मारहाण केली होती. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. आता हरी सिंह याची आत्मा रेल्वे स्थानक परिसरात न्यायासाठी फिरत असते, असं तेथील नागरिक सांगतात.

4) मुलुंड रेल्वे स्थानक

तुम्हाला कदाचित विशेषत: मुंबईकरांना कल्पना होणार नाही की, मुंबईतील मुलुंड रेल्वे स्थानक हेदेखील एक भीतीदायक रेल्वे स्टेशन असेल. पण हे रेल्वे स्टेशनही Haunted मानलं जातं. रात्रीच्या वेळी या रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना बऱ्याचदा कुणाच्या तरी ओरडण्याचा, किंचाळण्याचा आणि रडण्याचा आवाज येतो. रेल्वे रुळ ओलांडताना ज्या लोकांचा जीव गेला त्यांचा तो आवाज असतो, असा दावा स्थानकाच्या आजूबाजूच्या परिसरात राहणारे नागरिक करतात.

5) नैनी रेल्वे स्टेशन

उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील नैनी रेल्वे स्टेशनदेखील Haunted रेल्वे स्थानकांमध्ये गनलं जातं. रेल्वे स्टेशनजवळच नैनी जेल आहे. या जेलमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक स्वातंत्र्यसैनिक कैद होते. त्यांनी जेलमध्ये प्रचंड अत्याचार आणि यातना सोसल्या होत्या. अनेकांचा त्यातच मृत्यू झाला होता. रेल्वे स्थानक परिसरात त्याच स्वातंत्र्य सैनिकांच्या आत्मा फिरतात, असा दावा तेथील नागरिक करतात.

हेही वाचा :

कोरोना चाचणीसाठी आता थुंकीचे नमुने, नागपूरच्या ‘NEERI’चं संशोधन, वेळ आणि खर्चाची बचत

अधिकाऱ्यांवर भरवसा नाही, नितीन राऊतांचा थेट कृषी मंत्र्यांना फोन; वीज पुरवठ्याची घेतली माहिती

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.