‘प्रथम’ तुम्हाला भाकरी मिळवून देण्याचा विचार करतं; शाळाबाह्य मुलांसाठी काम करणाऱ्या मेंटॉर मनस्विनी सांगतात प्रथमचं मोठं काम

कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद राहिल्या, आणि शिक्षणावर याचा खूप मोठा विपरित परिणाम झाला, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यासाठीच आता प्रथम एज्युकेशनने त्याही पुढचा पर्याय शोधला आहे. गावागावातून त्यांनी रिडिंग कॅम्प आयोजित केले आहेत.

‘प्रथम’ तुम्हाला भाकरी मिळवून देण्याचा विचार करतं; शाळाबाह्य मुलांसाठी काम करणाऱ्या मेंटॉर मनस्विनी सांगतात प्रथमचं मोठं काम
Pratham Education kolhapur
Image Credit source: TV9
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: महादेव कांबळे

Mar 08, 2022 | 9:00 PM

कोल्हापूरः प्रथम एज्युकेशन (Pratham Education) फाऊंडेशन म्हणजे शाळा, विद्यार्थी (Student) आणि शाळाबाह्य असणाऱ्या युवावर्गासाठी आणि त्यांच्या रोजगाराची (Jobs) उपलब्धी करुन देणारी संस्था. शाळाबाह्य मुलांसाठी अगदी गंभीरपणे विचार करुन प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनचे अनेक सदस्य या कामासाठी आता महाराष्ट्रातील अनेक वाड्या वस्त्यांतून पायपीठ करत आहेत. प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनच्या मेन्टॉर मनस्विनी देव या चंदगड आणि आजरा तालुक्यातील गावांसाठी काम करतात.

चंदगड तालुक्यातील गावागावातून जाऊन शाळा बाह्य मुला-मुलींचे सर्वेक्षण करायचे आणि त्यांना प्रशिक्षण आणि नोकरी या दोन्ही गोष्टीसाठी मुला मुलींना मनवत राहायचं. प्रशिक्षणासाठी मुलं तयार होतात का, या या प्रश्नावर त्या हसत हसत उत्तर देतात आणि म्हणतात, लोकांचा गैरसमज होतो की, आम्ही कुणी एकही पैसा न घेता त्यांनी नोकरीची संधी कशी काय उपलब्ध करुन देतो. एवढ्या लांबून ऊनातान्हातून यायचं मुला मुलींनी समजवायचं आणि त्यांना टू व्हिलर, फोर व्हिलर, मोटर मॅकेनिक याच्या प्रशिक्षणाला पाठवायचं. प्रशिक्षणानंतर त्यांना नोकरीही आमचीच संस्था देते, तेही कोणतीही फी न घेता. म्हणून लोकांना वाटतं ही प्रथम एज्युकेशनची माणसं एकही पैसा न घेता नोकरी कसं काय देतात. पण आता चंदगड तालुक्यात अनेक लोकांना या संस्थेबद्दल माहिती होतेय की, ही संस्था शाळाबाह्य मुलां-मुलींसाठी काही तरी चांगलं करते आहे.

ग्रामीण महिलांना रोजगार

मनस्विनी देव या संस्थेच्या चंदगड आणि आजरा तालुक्यासाठी मेंटॉर आहेत. सकाळी घरातील कामं आवरुन रोज तीस पस्तीस कि. मी. चा प्रवास करुन चंदगड तालुक्यातील अनेक गावांचा त्यांनी सर्वे केला आहे. त्यांनी पहिल्या टप्प्यात चंडगड तालुक्यातील नागनवाडी गावातील दहावी-बारावी झालेल्या महिलांना हेल्थ केअरच्या प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले आहे. सध्या या महिला कोल्हापूर जिल्ह्यातील साई रुग्णालयात काम करत आहेत. त्या म्हणतात की, प्रथम एज्युकेशनमुळे थांबलेल्या आयुष्यातील शिक्षणाला पुन्हा सुरुवात झाली आहे.

शाळकरी मुलांसाठी रिडिंग कॅम्प

मनस्विनी यांनी दहावी, बारावी आणि पदवी करुनही नोकरी मिळाली नाही म्हणून जी मुलं पाहिजे ती काम करत होती, त्यांना आता प्रथमतर्फे फोर व्हिलर मेकॅनिकलचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या मुलांच्याही प्रतिक्रिया खूप बोलक्या आहेत, ते म्हणतात की, प्रथमसारखी संस्था एक पैसा न घेता आम्हाला शिकवत आणि नोकरीला लावते. खरं तर या संस्थेमुळेच आम्हाला आता नोकरी मिळाली असल्याचेही ते सांगतात.

शिक्षणावर  विपरित परिणाम

कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद राहिल्या, आणि शिक्षणावर याचा खूप मोठा विपरित परिणाम झाला, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यासाठीच आता प्रथम एज्युकेशनने त्याही पुढचा पर्याय शोधला आहे. गावागावातून त्यांनी रिडिंग कॅम्प आयोजित केले आहेत. शाळेत जाणाऱ्या मुलांना एकत्र करुन त्यांची आकलन क्षमता आणि त्यांचे बौद्धीक क्षमतेसाठी प्रथमकडून रिडिंग कॅम्प सुरु करण्यात आले आहेत.

रिडिंग कॅम्पसाठी स्वयंसेवक

रिडिंग कॅम्पसाठी मनस्विनी देव यांना चंदगड तालुक्यातील अनेक गावांतून जात स्वयंसेवक निवडून त्यांच्याकडून रिडिंग कॅम्प भरवण्यात येत आहे. यासाठी जे ,स्वयंसेवक निवडले गेले आहेत त्यांच्यासाठी मोफत इंग्लिश स्पिकिंग कोर्स देण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या

Mumbai महापालिका निवडणूक समोर ठेवून धाडी टाकत असाल तर ते Boomerang होईल -Sanjay Raut

Women’s Day | त्याच्याएवढंच काम करताय, पण पगार बरोबरीचा नाही? कुठे करणार तक्रार? समान वेतन कायदा काय?

Women’s Day | एकत्र कुटुंबाची पंचक्रोशीत चर्चा, सर्व मुलांना उच्च शिक्षण; स्वत: अशिक्षित

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें