AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Work From Home | आनंददायी वाटणारे ‘वर्क फ्रॉम होम’ त्रासदायी, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर परिणाम

वर्क फ्रॉम होममुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ बिघडत असल्याचे अनेक अभ्यासांमधून समोर आले आहे. ( Work From Home )

Work From Home | आनंददायी वाटणारे 'वर्क फ्रॉम होम' त्रासदायी, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर परिणाम
| Updated on: Dec 08, 2020 | 12:44 PM
Share

नवी दिल्ली: चीनमधून संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणू संसर्गानंतर लोकांच्या जीवनात अनेक बदल झाले. कोरोना संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारण्यात आला. यानंतर ‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना पुढे आली. 2020 हे वर्ष सुरु होताना चांगली वाटणारी या संकल्पनेचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. वर्क फ्रॉम होममुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ बिघडत आहे. (Work From Home bad impact on Mental and Physical health of people)

2020 चे स्लोगन वर्क फ्रॉम होम

कोरोना संसर्गामुळं वर्क फ्रॉम होम ही संकल्पना पुढे आणली गेली. सुरुवातीच्या दिवसात अनेकांना ही संकल्पना आवडली. ऑफिलला जाण्याचा वेळ आणि माघारी येण्याचा वेळ वाचत होता. मात्र, वर्क फ्रॉम होमचा कालावधी वाढत गेला तसे याचे दुष्परिणाम समोर येऊ लागले. अनेक संस्थांनी वर्क फ्रॉम होमच्या परिणामांसंबधी अभ्यास केला. त्यामध्ये याचे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या नकारात्मक परिणाम दिसून आले. (Work From Home bad impact on Mental and Physical health of people)

साऊथ कॅलिफोर्निया विद्यापीठाकडून स्‍टडी जर्नल ऑफ ऑक्‍यूपेशनल अँड इनवायरमेंटल मेडिसीन हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अभ्यासानुसार वर्क फ्रॉम होम संकल्पनेचा स्त्री आणि पुरुषांवर नकारात्मक परिणाम दिसून येत आहे. पुरुषांच्या तुलनेत वर्क फ्रॉम होम संकल्पना महिलांसाठी अडचणीची ठरली आहे. वर्क फ्रॉम होममुळे पुरुष आणि महिलांच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीवर नकारात्मक परिणाम करत असल्याचे दिसून आले. महिलांच्या कामात पहिल्यापेक्षा अधिक वाढ झाली आहे.(Work From Home bad impact on Mental and Physical health of people)

शारीरिक आणि मानसिक त्रास वाढला

वर्क फ्रॉम होममुळं घरातून काम करणाऱ्यांच्या कामाचे तास वाढल्याचे दिसून आले आहे. अनेकजण कामाच्या निर्धारित तासांपेक्षा एक ते दोन तास अधिक काम करतात, असं दिसून आलं आहे. या संकल्पनेमुळं नवीन कौशल्य शिकण्याच्या क्षमतेवरही परिणाम झाला आहे. वर्क फ्रॉम होमच्या करण्यात आलेल्या सर्वेत 64 टक्के लोकांनी आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्याचे सांगतिले. 75 टक्के लोकांनी वर्क फ्रॉमहोममुळे मानसिक संतुलन बिघडल्याचे सांगतिले.

घरातून काम करणाऱ्या लोकांच्या शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. रोजचा व्यायाम देखील कमी झाला आहे. ऑफिसला जाणे आणि माघारी येणे यातून होणारा होणारा रोजचा व्यायामदेखील कमी झाला. लोकांचे भावविश्व त्यांच्या घर आणि फ्लॅटपुरते मर्यादित झाले असून सामाजिक संपर्क देखील कमी झाले आहेत.(Work From Home bad impact on Mental and Physical health of people)

मानव हा इतरांपेक्षा वेगळा प्राणी आहे. त्याला सामाजिक जीवन आहे. अनेकांशी बोलणे, भेटी घेणे, मनोरंजन, खेळ या गोष्टी मनुष्याच्या जीवनात आनंद निर्माण करतात. या गोष्टी बंद झाल्यातर मानवाच्या मानसिक अवस्थेवर परिणाम होत असतो. कोरोना विषाणू संसर्गामुळं मानवाच्या जीवनावर विपरीत परिणाम केला आहे. कोरोनामुळं निर्माण झालेल्या परिस्थितीत काम सुरु ठेवण्यासाठी आलेल्या संकल्पनेचा मनुष्याच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झालेला नाही.

कोरोना विषाणू संसर्गाच्या अगोदर सर्वांच्या समोर दु:ख आणि इतर गोष्टींबाबत तक्रारी असायच्या. मात्र, कोरोना काळापूर्वीच्या प्रवासाचं स्वातंत्र्य, बोलण्याचं स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य होतं. या गोष्टींचं महत्व कोरोनानं आपल्या लक्षात आणून दिले. कोरोना विषाणू संसर्ग संपून जावा, कोरोनावरील लस लवकर उपलब्ध होण्याची सर्वजण वाट पाहत आहेत. कोरोनापूर्वीच्या आनंदी जीवनासारखी स्थिती सामान्य व्हावी, असं प्रत्येकाला वाटत आहे.

संबंधित बातम्या:

Work From Home | पुढच्या वर्षी ऑफिसला या! आयटी कंपन्यांना 31 डिसेंबरपर्यंत ‘वर्क फ्रॉम होम’ला मुदतवाढ

निम्म्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ न दिल्यास कंपनीवर कारवाई.

(Work From Home bad impact on Mental and Physical health of people)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.