Myra : सुंदर हावभाव आणि नटखट अंदाज, ‘माझी तुझी रेशीमगाठ’मालिकेतील परीचा क्यूट अंदाज

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 28, 2021 | 1:56 PM

प्रार्थना आणि श्रेयससोबतच आता चिमुकली मायरा देखील प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे या दोन बड्या कलाकारांच्या छोट्या पडद्यावरील पुनरागमनाच्या चर्चेपेक्षाही क्युट मायरा भाव खाऊन जात आहे. (Beautiful gestures and naughty guesses, cute look of the Pari from 'Mazi Tuzi Reshimgath')

Sep 28, 2021 | 1:56 PM
‘माझी तुझी रेशीमगाठ’या मालिकेत श्रेयस आणि प्रार्थना सोबत झळकणारी चिमुकली मायरा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. मालिका सुरु होण्याआधीपासून मायरा प्रेक्षकांची लाडकी बनली होती.

1 / 5
प्रार्थना आणि श्रेयससोबतच आता चिमुकली मायरा देखील प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे या दोन बड्या कलाकारांच्या छोट्या पडद्यावरील पुनरागमनाच्या चर्चेपेक्षाही क्युट मायरा भाव खाऊन जात आहे.

2 / 5
मायरा वायकुळने टिकटॉक व्हिडीओजच्या माध्यमातून प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. टिकटॉक स्टार म्हणून तिची ओळख होती. सध्या इन्स्टाग्रामवरही तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. सध्या तिचे 75 हजारांपेक्षा जास्त (75.3k) चाहते आहेत.

3 / 5
झी मराठी वाहिनीवर नुकत्याच सुरु झालेल्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या नवीन मालिकेच्या प्रोमोमध्ये जेमतेम चार वर्षांची एक चिमुरडी अभिनेता श्रेयस तळपदेच्या व्यक्तिरेखेसोबत लग्नाची बोलणी करताना दिसली होती. काय म्हणणं आहे? कमवतो किती? नोकरी कुठे करतो? असे प्रश्न ही चिमुरडी विचारते. त्यावर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेचा हा हिरो तिच्या वयाला समाधानकारक उत्तरं देतो. त्यानंतर विचार करुन सांगते, असं निरागस उत्तर देते.

4 / 5
‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत प्रेक्षकांचं मन जिंकून घेणाऱ्या या चिमुरडीचं नाव आहे मायरा वायकुळ. युट्यूबवर Myra’s corner हे मायराचे चॅनल आहे. त्यावर तिचे आतापर्यंत 105K म्हणजे एक लाख पाच हजाराहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. या चॅनलवर मायराचे अनेक व्हिडीओ तुम्हाला पाहायला मिळतील. मायराच्या योगा सेशन, खेळण्यांपासून तिने बनवलेला केक आणि हळदी कुंकू समारंभापर्यंत अनेक व्हिडीओ दिसतात.

5 / 5

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI