Aai Kuthe Kay Karte : स्टार प्रवाहच्या ‘आई कुठे काय करते’ मालिकेत रंगणार भोंडल्याचा खेळ, पाहा खास फोटो

कोकणात नवरात्रीमध्ये भोंडला खेळण्याची प्रथा आहे. नवरात्रीच्या दिवसात पाटावर हत्ती काढून त्याची पूजा केली जाते. घरातल्या स्त्रिया आणि मुली त्याभोवती फेर धरुन भोंडल्याची पारंपरिक गाणी बोलतात. (Bhondla's game to be played in Star Pravah's 'Aai Kuthe Kay Karte' serial, see special photo)

1/5
नवरात्रीच्या उत्सवाचा जल्लोष सध्या सगळीकडेच पाहायला मिळतोय. स्टार प्रवाहच्या ‘आई कुठे काय करते’ मालिकेतही हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा होणार आहे.

2/5
देशमुख कुटुंबात प्रत्येक सणाला विशेष महत्त्व आहे. सणाचं पावित्र्य जपत संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन आनंद लुटताना दिसतात. सध्या घरात तणावाचं वातावरण असलं तरी कांचन आजीने मात्र पुढाकार घेत हा नवरात्रीचा सण साजरा करण्याचं ठरवलं आहे.

3/5
कोकणात नवरात्रीमध्ये भोंडला खेळण्याची प्रथा आहे. नवरात्रीच्या दिवसात पाटावर हत्ती काढून त्याची पूजा केली जाते. घरातल्या स्त्रिया आणि मुली त्याभोवती फेर धरुन भोंडल्याची पारंपरिक गाणी बोलतात.

4/5
महिलांच्या सुफलीकरणाचा सण म्हणून या सणाला विशेष महत्त्व आहे.  देशमुख कुटुंबात हा पारंपरिक भोंडला उत्साहात खेळला जाणार आहे.

5/5
मराठी परंपरा मराठी प्रवाह हे स्टार प्रवाह वाहिनीचं ब्रीदवाक्य आहे. त्यामुळे मालिकांमधून मराठी परंपरा जपण्याचा प्रयत्न केला जातो. तेव्हा अरुंधती आणि संपूर्ण देशमुख कुटुंबाचा हा भोंडला नक्की पाहा.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI