Rajeshwari Kharat | मराठमोळ्या शालूची आता बॉलिवूडमध्ये एंट्री! हिंदीतही दाखवणार अभिनयाचा जलवा

‘शालू’ फेम अभिनेत्री राजेश्वरी खरात आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. राजेश्वरी आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. तिच्या आगामी हिंदी चित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.

1/5
मराठी चित्रपटाचे आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या (Nagraj Manjule) यांचा गाजलेल्या ‘फँड्री’ (Fandry) या चित्रपटातील सोज्वळ चेहऱ्याची शालू म्हणजेच राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) नेहमीच सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. ती चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ नेहमीच शेअर करत असते.

2/5
मात्र, ‘शालू’ फेम अभिनेत्री राजेश्वरी खरात आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. राजेश्वरी आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. तिच्या आगामी हिंदी चित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.

3/5
लवकरच 'पुणे टू गोवा' या बॉलिवूड चित्रपटात राजेश्वरी झळकणार आहे. अमोल भगत या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. हा एक कॉमेडी चित्रपट असणार आहे. कथा विनोदी शैलीची असली तरी, यात थ्रीलर आणि सस्पेन्सही पाहायला मिळणार असल्याचे कळते आहे.

4/5
पुणे ते गोवा या रोमांचक प्रवासावर आधारित या चित्रपटाची कथा असणार आहे. लाडक्या शालूला अर्थात राजेश्वरीला या चित्रपटात पाहण्यासाठी प्रेक्षक आणि चाहते देखील प्रचंड आतुर झाले आहेत.

5/5
राजेश्वरीने आपल्या सहज सुंदर अभिनयाने तिने ‘फँड्री’ चित्रपटात उत्कृष्ट काम केले होते. आपल्या अभिनयाने तिने रसिकांच्या मनावर ठसा उमटवला होता. ‘शालू’चे पात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी मेहनत घेणारी शालू आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करून हिंदीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI