AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेजुरीची स्वराली कामथे झळकणार ‘जिप्सी’मध्ये; 200 मुलींमधून झाली तिची निवड

आगामी 'जिप्सी' (Gypsy) या चित्रपटातून बालकलाकार स्वराली कामथे चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. दोनशे मुलींमधून स्वरालीची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली असून, जिप्सी या चित्रपटाचा पुण्यात नुकताच मुहूर्त करण्यात आला.

| Edited By: | Updated on: May 02, 2022 | 10:34 AM
Share
आगामी 'जिप्सी' (Gypsy) या चित्रपटातून बालकलाकार स्वराली कामथे चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. दोनशे मुलींमधून स्वरालीची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली असून, जिप्सी या चित्रपटाचा पुण्यात नुकताच मुहूर्त करण्यात आला.

आगामी 'जिप्सी' (Gypsy) या चित्रपटातून बालकलाकार स्वराली कामथे चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. दोनशे मुलींमधून स्वरालीची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली असून, जिप्सी या चित्रपटाचा पुण्यात नुकताच मुहूर्त करण्यात आला.

1 / 5
यश मनोहर सणस त्यांच्या यश सणस फिल्म्स या निर्मिती संस्थेद्वारे बोलपट क्रिएशन्सच्या सहयोगाने 'जिप्सी' या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. आतापर्यंत 25 हून अधिक चित्रपटांसाठी क्लॅप बॉय, सहाय्यक दिग्दर्शक अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्यानंतर शशी चंद्रकांत खंदारे दिग्दर्शक म्हणून आपला पहिला चित्रपट करत आहेत.

2 / 5
श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी मठ धनकवडी पुणे येथे जिप्सी या आगामी सिनेमाचा मुहूर्त नगरसेवक राजेंद्र आबा शिळीमकर यांच्या हस्ते संपन्न झाला. जिप्सीतील प्रमुख भूमिकेसाठी सात-आठ वर्षांची बालकलाकार हवी होती. मात्र तिच्याकडे अभिनयाव्यतिरिक्त अन्य कौशल्यं असणंही आवश्यक होतं.

3 / 5
त्यानुसार सुरुवातीला दोनशे मुलींची प्रोफाईल तपासण्यात आली. पुण्यात ऑडिशन ठेवण्यात आली. सत्तर ऐंशी बाल कलाकार ऑडिशनला आले. त्यातील भूमिकेला चपखल बसणारी स्वराली कामथेही होती. जेजुरीला राहणारी स्वराली तिसरीत शिकत आहे.

4 / 5
स्वराली नृत्यात निपुण आहे. त्याशिवाय ती तायक्वांदो, पार्कओव्हर, जिम्नॅस्टिक्सही शिकते. त्यासाठी ती आईबरोबर रोज जेजुरी ते पुणे प्रवास करते. त्यामुळे अत्यंत कष्टाळू असलेल्या स्वरालीमुळे जिप्सीतील भूमिकेला चार चाँद लागतील यात शंका नाही. जिप्सी या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं होतं. तर चित्रपटाचं चित्रीकरणही लवकरच सुरू होणार आहे.

5 / 5
Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...