AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॅन्सरशी झुंज देणाऱ्या हिना खानने स्वत:च्याच केसांपासून बनवला विग

किमोथेरेपीमुळे केस गळतात. त्यामुळे आधीच हिंमत दाखवत हिनाने तिचे केस छोटे केले होते. त्यानंतर तिने टक्कल केलं. त्याचा व्हिडीओसुद्धा तिने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. हिनाला पाहून तिची आई भावूक झाल्याचं या व्हिडीओमध्ये दिसलं होतं.

| Updated on: Aug 15, 2024 | 11:26 AM
Share
'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खान ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे. मुंबईतल कोकिलाबेन रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असून सोशल मीडियावर ती विविध पोस्ट लिहित आहे. किमोथेरेपीमुळे केस गळतात, त्यामुळे हिनाने आधीच तिचे सर्व केस कापले होते. आता त्याच केसांपासून तिने विग बनवला आहे.

1 / 5
नुकत्याच एका पोस्टद्वारे हिनाने याबद्दलची माहिती दिली. 'कॅन्सरचं निदान होताच मला समजलं होतं की केस गमवावे लागणार आहेत. त्यामुळे मी आधीच माझे केस कापून टाकले. त्याच केसांपासून मी विग बनवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय खूप ताकद देणारा ठरला आहे', असं तिने म्हटलंय.

2 / 5
कॅन्सरचा सामना करणाऱ्या इतर महिलांनाही हिनाने संदेश दिला आहे. 'जर तुम्हाला माझा हा निर्णय योग्य वाटला असेल तर तुम्हीसुद्धा असंच करा, हा सल्ला मी देईन. यामुळे किमान एक गोष्ट तरी सोपी होईल आणि तुम्हाला बरं वाटेल', असं तिने लिहिलं आहे.

3 / 5
किमोथेरेपीदरम्यान केस गळतात. त्यामुळे हिनाने आधीच तिचे लांब केस कापून छोटे केले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी तिने पूर्णपणे टक्कल केलं होतं. आता त्याच केसांपासून विग बनवल्याचं सांगत हिनाने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

4 / 5
हिना सध्या कर्करोगावरील उपचार घेत आहे. सर्जरीनंतर तिच्यावर किमोथेरेपी सुरू आहे. पहिल्या किमोनंतर हिनाच्या शरीरावर काही डागसुद्धा दिसून आले. याविषयी नेटकऱ्यांनी काळजी व्यक्त केली होती. मात्र सकारात्मक विचार डोक्यात ठेवून या सर्व गोष्टींना सामोरं जात असल्याचं हिनाने चाहत्यांना सांगितलं आहे.

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?