होळीला नक्की किती फेऱ्या मारणे शुभ? 99 टक्के लोक देतात चुकीची माहिती

होळीच्या दिवशी होलिका दहनासाठी प्रदक्षिणा कशी घालावी आणि त्याचे धार्मिक महत्त्व काय आहे, याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

| Updated on: Mar 01, 2026 | 3:22 PM
1 / 8
होळी हा सण वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक मानला जातो. होळीच्या दिवशी होलिकादहनाला विशेष महत्त्व दिले जाते. हिंदू धर्मात या दिवशी धार्मिक विधींनुसार लाकूड एकत्र बांधून अग्नी पेटवली जाते. त्यानंतर त्याभोवती प्रदक्षिणा घालण्याची परंपरा असते.

2 / 8
यंदा २ मार्च रोजी होलिका दहन केले जाणार आहे. होळीच्या अग्नीभोवती किती फेऱ्या मारव्यात, असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. आज आपण होळीभोवती किती फेऱ्या माराव्यात आणि त्याचे काय महत्त्व असते, याची माहिती जाणून घेणार आहोत.

3 / 8
धार्मिक मान्यतेनुसार, होलिका दहनाच्या वेळी प्रदक्षिणेची संख्या एक, तीन किंवा सात असू शकते. जर तुम्ही १ फेरी मारत असला तर ती मनात एक निश्चित संकल्प करून वाईटाचा त्याग करण्यासाठी आणि सकारात्मकता स्वीकारण्यासाठी मारली जाते.

4 / 8
जर तुम्ही ३ फेऱ्या मारत असाल तर या फेऱ्या ब्रह्मा, विष्णू आणि महेश (त्रिमूर्ती) तसेच सत्व, रज आणि तम या तीन गुणांचे प्रतीक मानल्या जातात. बहुतेक लोक संतुलन आणि शुभ गोष्टींसाठी तीन फेऱ्या मारतात.

5 / 8
विशेष इच्छापूर्तीसाठी ७ फेऱ्या मारल्या जातात. हे सात फेरे जीवनातील सात प्रतिज्ञा, सात जन्म आणि सात लोकांशी जोडलेले असल्याचे मानले जाते. हे अत्यंत फलदायी मानले जाते.

6 / 8
होलिका दहन करण्यापूर्वी अग्नीला कच्चा धागा, नारळ, गव्हाची कणसे, गूळ आणि हरभरा अर्पण करावा. अग्नी पेटवल्यानंतर हात जोडून प्रार्थना करावी. तसेच ही प्रदक्षिणा नेहमी घड्याळाच्या दिशेने उजवीकडून डावीकडे घालावी.

7 / 8
ही प्रदक्षिणा करताना कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी आणि नकारात्मक शक्तींपासून संरक्षणासाठी देवाला साकडे घालावे. यानंतर शेवटी होलिकेची राख कपाळावर टिळा म्हणून लावावी, हे करणं अत्यंत शुभ मानले जाते.

8 / 8
ज्योतिषशास्त्रानुसार, अग्नी हा पवित्रतेचा कारक आहे. होलिका अग्नीभोवती प्रदक्षिणा घातल्याने शरीर आणि मनातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरात सकारात्मकता, सुख आणि समृद्धी नांदते. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us