मधाच्या वापराने त्वचेला मिळतो अनोखा फायदा, जाणून तर घ्या माहिती …

मानसी मांडे,  Tv9 मराठी

|

Updated on: Jan 31, 2023 | 4:26 PM

मधाचा वापर केवळ स्वयंपाकघरात खाण्यासाठी नव्हे तर त्वचेसाठी सौंदर्य प्रसाधनांमध्ये करता येतो.

Jan 31, 2023 | 4:26 PM
मध खायला जितका फायदेशीर असतो तितकाच तो त्वचेसाठीही लाभदायक ठरतो. मधामुळे त्वचेला अनेक फायदे मिळतात. मधाचा वापर त्वचेसाठी सौंदर्य प्रसाधनांमध्ये करता येतो. मध त्वचेचे पीएच राखण्याचे कार्य करतो.

1 / 5
ओठ होतात मऊ - मधाच्या वापराने तुमचे ओठ मऊ होऊ शकतील. त्यासाठी एका वाटीत एक चमचा साखर घेऊन त्यामध्ये थोडा मध मिसळावा. हे मिश्रण 20 मिनिटे ओठांवर लावून ठेवावे व नंतर धुवून टाकावे. नियमित वापराने तुम्हाला मऊ व गुलाबी ओठ मिळतील.

2 / 5
 त्वचेचा रंग उजळतो - मधाचा वापर केल्याने त्वचेवरील डेड स्कीन म्हणजेच मृत त्वचा निघून जाते. यामुळे आपली त्वचा उजळते. डेड स्कीन काढण्यासाठी संत्र्याच्या सालांच्या पावडरमध्ये एक चमचा मध मिसळून ते त्वचेला लावून हलक्या हाताने स्क्रब करावे. नंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून टाका.

3 / 5
सॉफ्ट स्किन - मधाच्या वापराने आपली त्वचाही मऊ होते. त्यासाठी तुम्ही मध व कोको पावडरचा उपयोग करू शकता. त्यासाठी कोको पावडर व मध एकत्र करून त्वचेवर लावा आणि 15 मिनिटांनी धुवून टाका. यामुळे तुम्हाला सॉफ्ट स्किन मिळू शकेल.

4 / 5
चमकदार त्वचा - तुम्हाला चमकदार त्वचा हवी असेल तर मध गुणकारी ठरतो. यासाठी काकडी व लिंबाच्या रसात अर्धा चमचा मध मिसळून फ्रीजमध्ये ठेवा. मिश्रण घट्ट झाल्यानंतर ते त्वचेला लावून 5 ते 10 मिनिटे मसाज करावा. ड्राय स्किनसाठी एक केळ कुस्करून त्यात एक चमचा बेसन व मध घालून ते त्वचेवर लावावे. 20 मिनिटांनी धुवून टाकावे.

5 / 5

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI