तुमच्याकडे मारुती सुझुकीची ‘ही’ कार असल्यास सावध व्हा; क्रॅश टेस्टमध्ये नापास

भारतीय ग्राहक हल्ली गाडी खरेदी करताना आपल्या आणि वाहनाच्या सुरक्षिततेचा (Car Safety) अधिक विचार करत असल्याचे निदर्शनास आले आहे.

| Updated on: Mar 15, 2021 | 6:58 PM
भारतीय ग्राहक गेल्या काही वर्षांपासून गाडी खरेदी करताना आपल्या आणि वाहनाच्या सुरक्षिततेचा (Car Safety) अधिक विचार करत असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रत्येक ग्राहक त्याची ड्रिम कार किती सुरक्षित आहे, याचा विचार हमखास करतो.

1 / 5
जगभरात अशा अनेक कंपन्या आहेत ज्या वाहनं बनवताना केवळ तिच्या लुक्स आणि फिचर्सचाच विचर न करता कारच्या सुरक्षिततेचाही खूप विचार करतात. परंतु काही कंपन्या अशाही आहेत ज्यांच्या कार बाहेरुन दमदार दिसतात, परंतु मजबुती आणि सुरक्षिततेच्या बाबतीत मागे पडतात. Maruti Suzuki S-Presso ही कार त्याचंच एक उदाहरण आहे, असं म्हणता येईल.

2 / 5
ग्बोबल NCAP (New Car Assessment Programme) द्वारे टेस्ट केल्यानंतर मारुती सुझुकीच्या एस-प्रेसो (Maruti Suzuki S-Presso) या कारला शून्य रेटिंग देण्यात आलं आहे. तसेच ही कार सुरक्षित नसल्याचं प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. सुरक्षिततेच्या बाबतीत एस-प्रेसो ही कार पूर्णपणे नापास झाली आहे. गाडीमध्ये केवळ चालकाच्या बाजूला एअरबॅग देण्यात आली आहे. गाडीमध्ये एअरबॅगचं किती महत्त्व आहे, ही बाब सगळेच जाणतात. तरीदेखील कंपनीने गाडीतील इतर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार केलेला दिसत नाही.

3 / 5
परिक्षणानंतर एक महत्त्वाची गोष्ट नमूद करण्यात आली आहे की, या गाडीमधील चालक आणि सह-चालकाची छाती आणि मान बिलकुल सुरक्षित नाही. चालकाचे गुडघेदेकील सुरक्षित नाहीत. डॅशबोर्डमुळे सह-चालकाचे गुडघे थोडे सुरक्षित राहीले. एस-प्रेसोच्या बॉडीशेललादेखील फार चांगलं रेटिंग मिळालेलं नाही. ही गाडी अधिक लोडिंग झेलण्यास सक्षम नाही.

4 / 5
मारुती एस-प्रेसोची किंमत 3.71 लाखांपासून ते 5.8 लाख रुपयांपर्यंत आहे. ही छोटी एसयूव्ही Standard, LXI, VXI आणि VXI+ या चार व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. एस प्रेसोमध्ये 10 पेक्षा जास्त सेफ्टी फीचर्स देण्यात आल्याचे कंपनीने सांगितले आहे. ईबीडीसह एबीएस, ड्रायव्हर साइड एअरबॅग्स, रिअर पार्किंग सेन्सर्स, सीट बेल्ट रिमाइंडर आणि स्पीड अलर्ट सिस्टम असे फीचर्स यामध्ये आहेत. या कारच्या केवळ टॉप व्हेरिएंटमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग मिळते. तर इतर व्हेरिएंट्समध्ये दुसरी एअरबॅग ऑप्शनल आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.