नंदुरबार: देशातल्या सर्वात मोठ्या घोडे बाजाराला सारंगखेडा येथे सुरुवात झाली आहे. या यात्रेत आयोजकांनी आणखी एक आकर्षणाचं केंद्र पर्यटक आणि इतिहासप्रेमींसाठी उभारलं आहे. या ठिकाणी इतिहास कालीन शस्त्रं आणि विविध फुलांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. शस्त्र प्रदर्शनात मुगल कालीन आणि मराठ्यांच्या साम्राज्यातील शस्त्रांचा समावेश आहे. विशेष म्हणजे शेकडो वर्षे जुनी शस्त्रं आणि ढाल-तलवारी पाहण्यासाठी […]
या प्रदर्शनात तलवारी ढाल कट्यार, कुऱ्हाड,दांडपट्टा ,खंजीर, चाकू, सुऱ्या, सुवर्ण मूठजळीत तलवारीसोबत राजपूत राजे वापरत असणारी शस्त्रं- अस्त्र यांचा समावेश आहे.
नंदुरबार: देशातल्या सर्वात मोठ्या घोडे बाजाराला सारंगखेडा येथे सुरुवात झाली आहे. या यात्रेत आयोजकांनी आणखी एक आकर्षणाचं केंद्र पर्यटक आणि इतिहासप्रेमींसाठी उभारलं आहे.या ठिकाणी इतिहास कालीन शस्त्रं आणि विविध फुलांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. शस्त्र प्रदर्शनात मुगल कालीन आणि मराठ्यांच्या साम्राज्यातील शस्त्रांचा समावेश आहे.विशेष म्हणजे शेकडो वर्षे जुनी शस्त्रं आणि ढाल-तलवारी पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे.‘चेतक फेस्टिव्हल’मध्ये अमळनेर येथील स्पार्क फाऊंडेशनचे पंकज दुसाने यांच्या संग्रहातील शिवकालीन आणि मोगलकाळातील पुरातन शस्त्रांचं प्रदर्शन भरविण्यात आले आहे.या प्रदर्शनात तलवारी ढाल कट्यार, कुऱ्हाड,दांडपट्टा ,खंजीर, चाकू, सुऱ्या, सुवर्ण मूठजळीत तलवारीसोबत राजपूत राजे वापरत असणारी शस्त्रं- अस्त्र यांचा समावेश आहे.या वस्तू त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात फिरवून जमवल्या आहेत. त्याचसोबत त्यांच्या संग्रहात इतिहास कालीन कुलूप, अडकित्ते, दिवे आदी वस्तू आहेत.आजच्या पिढीला या वस्तूंची ओळख व्हावी, म्हणून हे इतिहासकालीन हत्यारांचं प्रदर्शन भरविण्यात आले आहे.या हत्यारांच्या माध्यमातून आपला समृद्ध इतिहास अभ्यासक आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिला असल्याचं, संग्रहक पंकज दुसाने यांनी सांगितलं.चेतक फेस्टिव्हलमध्ये येणाऱ्या पर्यटकांना या वर्षी जातिवंत घोड्यासोबत इतिहास कालीन हत्यारे पाहण्याची संधी मिळणार आहे.