AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘समाजाचं काहीतरी देणं लागतो’, पृथ्वीक प्रतापचा कौतुकास्पद पुढाकार; ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उचललं मोठं पाऊल

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापने ग्रामीण भागातील मुलांसाठी कौतुकास्पद सामाजिक पुढाकार घेतला आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील बंद पडलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या सुधारणा व पुनर्बांधणीची जबाबदारी त्याने उचलली आहे.

| Updated on: Oct 01, 2026 | 4:55 PM
Share
अनेक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांवर आपली भूमिका मांडताना दिसतात. मात्र, केवळ व्यक्त होण्यापलीकडे जाऊन एखाद्या समस्येवर प्रत्यक्ष काम करण्याचा प्रयत्न करणारे कलाकारही आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’  फेम अभिनेता पृथ्वीक प्रतापने असाच कौतुकास्पद पुढाकार घेतला आहे. ग्रामीण भागातील मुलांना चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, यासाठी त्याने मोठं पाऊल उचललं आहे. ( All Photos : Instgram)

1 / 6
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ द्वारे घराघरात पोहोचलेला पृथ्वीक प्रताप आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. मात्र, अभिनयासोबतच सामाजिक बांधिलकी जपत त्याने आता शिक्षण क्षेत्रातही योगदान देण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे जिल्ह्यातील बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या सुधारणा आणि पुनर्बांधणीची जबाबदारी त्याने हाती घेतली.

2 / 6
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील नदीचवाडी येथे ही शाळा आहे. विशेष म्हणजे, कधीकाळी या इमारतीचा वापर गोदाम म्हणून केला जात होता. विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्यामुळे शाळेच्या अस्तित्वावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. अशा परिस्थितीत आता या शाळेला नव्या स्वरूपात उभं करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

3 / 6
शाळेच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करून विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि चांगलं शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमामागचा उद्देश आहे. यासाठी पृथ्वीक प्रतापने ‘पारिजात’ संस्थेच्या सहकार्याने पुढाकार घेतला आहे.

4 / 6
‘ समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो’ या भावनेतून पृथ्वीकने हा उपक्रम हाती घेतल्याचं सांगितलं जात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक सुविधा मिळाव्यात आणि त्यांना चांगल्या वातावरणात शिकता यावं, यासाठी शाळेची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे.

5 / 6
आपल्या कामाने लोकप्रियता मिळवल्यानंतर आपल्या प्रसिद्धीचा उपयोग समाजासाठी करण्याचा पृथ्वीक प्रतापचा हा प्रयत्न लक्षवेधी ठरत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी त्याने उचललेलं हे पाऊल सामाजिक बांधिलकीचं उदाहरण म्हणून पाहिलं जात आहे.

6 / 6
Follow Us
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर प्रकरणात काय बोलणार?
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
Video : दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन, पाणी कपातीचे संकेत
संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल
Video: प्रदीप पूर्णेकर प्रकरण... संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल, 'जिथे राजकारण दिसतं तिथेच राऊत का जातात?'
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची...
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची भीती, धमक्यांचा दावा...
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य

पप्या शिंदे खंडणी विरोधी पथकात, आईची पहिली प्रतिक्रिया समोर; पुरणेकर..
Pradeep Purnekar Case | अटकेत असलेला आरोपी पप्या शिंदेला खंडणी विरोधी पथकात आणलं, आता...