AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशाला हादरवून सोडलेल्या सत्य घटनेवर आधारित 8 एपिसोड्सची सीरिज; जगभरात 1 नंबरवर होतेय ट्रेंड

देशाला हादरवून सोडणाऱ्या सत्य घटनेवर आधारित या वेब सीरिजला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. यामध्ये सोनाली बेंद्रे आणि अली फजल यांच्या मुख्य भूमिका आहेत. 12 जून 2026 रोजी ही सीरिज प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाली होती.

| Updated on: Jun 28, 2026 | 9:01 AM
Share
ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर मनोरंजनाचा भंडार आहे, कारण दर आठवड्याला नवनवीन चित्रपट किंवा वेब सीरिज त्यावर स्ट्रीम होत असतात. मात्र यापैकी काहीच चित्रपट किंवा वेब सीरिज ट्रेंडिंग यादीत अधिक काळापर्यंत टिकून राहतात. दोन आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झालेली अशीच एक क्राइम थ्रिलर वेब सीरिज सध्या जगभरात नॉन-इंग्लिश कॅटेगरीमध्ये पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे.

1 / 5
या क्राइम थ्रिलरची खास गोष्ट म्हणजे याची कथा काल्पनिक नसून खऱ्या घटनेवर आधारित आहे. आयएमडीबीवर याला दहापैकी 7.8 रेटिंग मिळाली आहे. या आठ एपिसोड्सच्या सीरिजचं नाव 'राख' असं आहे. गेल्या दोन वर्षांत प्राइम व्हिडीओवरील भारतातील सर्वांत मोठी ओरिजिनल सीरिज ठरली आहे. तसंच ही सीरिज 23 देशांमध्ये पहिल्या क्रमांकावर ट्रेंड झाली असून 60 देशांमधील टॉप 10 यादीतही तिने स्थान मिळवलं आहे. 12 जून रोजी जगभरात प्रदर्शित झालेली ही सीरिज नैतिकता, गुन्हा आणि न्याय यांच्यातील गुंतागुंत अत्यंत संवेदनशीलतेने हाताळते.

2 / 5
या सीरिजमध्ये अभिनेता अली फजलने त्याच्या कारकिर्दीतील उत्कृष्ट भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री सोनाली बेंद्रेनंही आईच्या भूमिकेत उत्तम अभिनय केला आहे. यामध्ये आमिर बशीर वडिलांच्या भूमिकेत असून आकाश मखिजा आणि रामदीप यादव यांनी खलनायकी भूमिका साकारल्या आहेत. प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर खोलवर छाप सोडली आहे.

3 / 5
ही वेब सीरिज 1978 च्या रंगा बिल्ला प्रकरणावर आधारित आहे. या दोघांनी मिळून चोरी, अपहरण, खून यांसारखे गंभीर गुन्हे केले होते आणि त्यानंतर त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. प्रोसित रॉय दिग्दर्शित 'राख' या सीरिजमध्ये सोनाली बेंद्रे, अली फजल, आमिर बशीर, आकाश मखिजा, रामदीप यादव, दिव्या शर्मा, विवान शर्मा, अंशुल चौहान, राकेश बेदी आणि दिव्येंदु भट्टाचार्य यांच्या भूमिका आहेत.

4 / 5
रंगा आणि बिल्ला यांनी नौदल अधिकारी मदन मोहन चोप्रा यांच्या दोन्ही मुलांचं अपहरण केलं होतं. या अपहरणादरम्यान बिल्लाने संजयवर चाकूने हल्ला केला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात गीता किंचाळू लागली तेव्हा वाटेत कोणीतरी गाडीत दोन मुलांना पाहून गाडीचा नंबर देऊन पोलिसांना कळवलं. मात्र तोवर फार उशीर झाला होता. रंगा आणि बिल्लाने संजय ठार मारलं आणि नंतर गीतावर बलात्कार केला. नंतर बिल्लाने गीताच्या मानेवर चाकूने वार केला, त्यात तिचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनं संपूर्ण देशाला हादरवून सोडलं होतं.

5 / 5
Follow Us
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान

मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...