‘या’ बँकेला RBIकडून मिळाली मोठी मंजुरी, ग्राहकांवर काय परिणाम होणार?

आरबीएल बँक
- भारतीय रिझर्व्ह बँकेने RBL बँकेला केंद्र आणि राज्यातील बँकांशी व्यवहार करण्याची मंजुरी दिली आहे. RBL बँकेकडून बुधवारी यासंर्भातील माहिती देण्यात आली.
- रिझर्व्ह बँकेच्या या परवानगीमुळे आता RBL बँक सरकारी विभाग आणि सरकारी व्यवसायाशी संबंधित व्यवहार करु शकेल.
- रिझर्व्ह बँकेने RBL बँकेला एक एजन्सी बँक म्हणून मान्यता दिली आहे. काही दिवसांपूर्वीच रिझर्व्ह बँकेने अनुसूचित क्षेत्रातील खासगी बँकांना एजन्सी बँकिंगसाठी मान्यता देण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा लाभ RBL बँकेला मिळाला आहे.
- या निर्णयामुळे आता RBL बँक सरकारी अनुदानचे वितरण, निवृत्तीवेतनाचे वाटप, आयकर, उत्पादन शुल्क, सीमा शुल्क, जीएसटी, स्टॅम्पिंग शुल्क, नोंदणी, वॅट यासारखे व्यवहार करु शकते.
- RBL बँकेला एजन्सी बँक म्हणून परवानगी मिळाल्याने आता सरकारी योजनांचे लाभार्थी, एलपीजी गॅस अनुदान, वृद्ध आणि विधवा महिलांच्या पेन्शनचे पैसे RBL बँकेत जमा होऊ शकतील. त्यामुळे RBL बँकेच्या ग्राहकांना अनेक नव्या सुविधा मिळतील.
- आरबीएल बँकेच्या ग्राहकांना या निर्णयामुळे अनेक आर्थिक व्यवहार करण्याची सोय उपलब्ध झाली आहे.






