AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चित्रपटांपासून दूर राहूनही सैफची पूर्व पत्नी करते भरपूर कमाई; मुंबईसह देहरादूनमध्येही प्रॉपर्टी

अभिनेता सैफ अली खानने 1991 मध्ये अमृता सिंहशी लग्न केलं होतं. तर 2004 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. अमृता आणि सैफला सारा आणि इब्राहिम ही दोन मुलं आहेत. अमृता आज चित्रपटांमध्ये फारशी सक्रिय नसली तरी तिची कोट्यवधींची संपत्ती आहे.

| Updated on: May 10, 2024 | 3:33 PM
Share
1983 मध्ये 'बेताब' या चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री अमृता सिंहने बॉलिवूडचा 80-90 दशकाचा काळ गाजवला होता. अमृता आता चित्रपटांमध्ये फारशी झळकत नाही. मात्र असं असतानाही आज तिची संपत्ती बरीच आहे.

1 / 6
अमृता सिंहच्या आईचं नाव रुक्साना सुल्ताना असं आहे. त्या काँग्रेस पक्षाच्या नेत्या होत्या. अमृताची आई अत्यंत श्रीमंत कुटुंबातून होती, असं म्हटलं जातं. अभिनेता सैफ अली खानला घटस्फोट दिल्यानंतर अमृताला पोटगी म्हणून पाच कोटी रुपये मिळाले होते.

2 / 6
पाच कोटी रुपयांच्या पोटगीशिवाय तिला एक बंगलासुद्धा मिळाला होता. आता अमृता तिच्या दोन मुलांसह ज्या बंगल्यात राहते, त्याचीही किंमत कोट्यवधींमध्ये आहे. सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही अमृता आणि सैफ यांची मुलं आहेत.

3 / 6
सारा तिच्या एका चित्रपटासाठी जवळपास दोन ते तीन कोटी रुपये मानधन घेते. तर इब्राहिमसुद्धा फिल्म इंडस्ट्रीत काम करण्यासाठी सज्ज झाला आहे. अमृताने सारासाठी मुंबईतील एका उच्चभ्रू परिसरात ऑफिस खरेदी केलं होतं. त्याचीही किंमत लाखो-करोडोंमध्ये असल्याचं म्हटलं जातंय.

4 / 6
अमृता सिंहच्या मामाचं देहरादून याठिकाणी आलिशान घर आणि मोठी जमीन होती. त्यांना ते घर आणि ती जमीन विकायची होती. मात्र अमृताने त्याला विरोध केला. तिने ते घर आणि जमीन एका केअरटेकरला सांभाळायला दिलं आणि नंतर ते आपल्या नावे केलं. याविरोधात मावशीने कोर्टात खटलासुद्धा दाखल केला होता. मात्र अमृताने हा खटला जिंकला आणि आता ती त्या 50 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे.

5 / 6
अमृताने मुंबईतही स्वत:चा फ्लॅट खरेदी केला होता. तिचा एक फार्महाऊससुद्धा आहे. घटस्फोटानंतर मुलगा आणि मुलगी 18 वर्षांची होईपर्यंत सैफने अमृताला दर महिन्याला एक-एक लाख रुपये दिले होते.

6 / 6
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...