शिल्पा शेट्टी शिर्डीत, साईंना सोन्याचा मुकूट अर्पण

सचिन पाटील

|

Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आपल्या परिवारासह शिर्डीच्या साई बाबांच्या दरबारी हजेरी लावली. बाबांच्या धुपारतीला हजेरी लावत, सर्वांनी साई समाधीचे दर्शन घेतले. शिल्पा शेट्टीसोबत पती राज कुंद्रा, आई, मुलगा आणि बहीण शमिता शेट्टी हे यावेळी उपस्थित होते. यावेळी शिल्पाने साईबाबांना 800 ग्रॅम सोन्याचा मुकूट अर्पण केला. या मुकूटाची किंमत अंदाजे 25 लाख रुपयांच्या आसपास आहे. शिल्पा गुरुवारी […]

शिल्पा शेट्टी शिर्डीत, साईंना सोन्याचा मुकूट अर्पण
साईबाबा संस्थानच्यावतीने उपजिल्हाधिकारी मनोज घोडे यांनी त्यांचा शाल-मूर्ती देऊन सत्कार केला.
Follow us
अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आपल्या परिवारासह शिर्डीच्या साई बाबांच्या दरबारी हजेरी लावली. बाबांच्या धुपारतीला हजेरी लावत, सर्वांनी साई समाधीचे दर्शन घेतले.
शिल्पा शेट्टीसोबत पती राज कुंद्रा, आई, मुलगा आणि बहीण शमिता शेट्टी हे यावेळी उपस्थित होते.
यावेळी शिल्पाने साईबाबांना 800 ग्रॅम सोन्याचा मुकूट अर्पण केला. या मुकूटाची किंमत अंदाजे 25 लाख रुपयांच्या आसपास आहे.
शिल्पा गुरुवारी संध्याकाळी सहपरिवार साईदर्शनासाठी पोहोचली. सोन्याचं दान किती आहे, यापेक्षा मनातील श्रद्धा आणि भाव महत्वाचा असल्याचं तिने यावेळी सांगितलं.
शिल्पा शेट्टी शिर्डीच्या साईबाबांची निस्सीम भक्त असून, ती वर्षातून किमान एकदातरी साईदर्शनासाठी आवर्जून शिर्डीत येते.
शिल्पाच्या विनंतीवरुन बाबांना अर्पण केलेला सुवर्णमुकूट साईबाबांच्या मूर्तीला काही वेळ परिधान करण्यात आला.
त्यानंतर साईबाबांच्या धुपारतीतही शिल्पाने संपूर्ण परिवारासह उपस्थिती दर्शवली.
दरम्यान तिला पाहण्यासाठी चाहत्यांनी आणि भाविकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती.
साईबाबा संस्थानच्यावतीने उपजिल्हाधिकारी मनोज घोडे यांनी त्यांचा शाल-मूर्ती देऊन सत्कार केला.

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI