AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुवावा की नाही? त्वचातज्ज्ञ म्हणतात…

रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुणे का गरजेचे आहे? जाणून घ्या त्वचातज्ज्ञांचा (Dermatologists) मोलाचा सल्ला आणि यामुळे त्वचेला होणारे मोठे फायदे व नुकसान होऊ शकतात.

| Updated on: Jun 09, 2026 | 3:15 PM
Share
निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी आपण अनेकदा महागडे ब्युटी प्रॉडक्ट्स वापरतो. परंतु, अनेकदा अगदी सोप्या आणि मूलभूत गोष्टींकडे आपले दुर्लक्ष होते. त्यापैकीच एक महत्त्वाची सवय म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुणे.

1 / 6
अनेक जण थकव्यामुळे किंवा आळसामुळे रात्री चेहरा न धुताच झोपतात. पण त्वचातज्ज्ञांच्या (Dermatologists) मते, ही एक चूक तुमच्या त्वचेचे मोठे नुकसान करू शकते. आज आपण रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुणे का गरजेचे आहे याबद्दलची माहिती घेऊया.

2 / 6
त्वचातज्ज्ञांच्या मते, आपली त्वचा रात्रीच्या वेळी स्वतःला 'रिपेअर' (Repair) करण्याचे काम करत असते. दिवसभरात झालेल्या नुकसानीतून त्वचा रात्रीच्या वेळी पूर्ववत होते. अशा वेळी जर त्वचेवर घाणीचा थर असेल, तर या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. म्हणूनच तज्ज्ञ रात्री चेहरा स्वच्छ धुण्याचा सल्ला आवर्जून देतात.

3 / 6
दिवसभरात हवेतील प्रदूषण, धूळ, माती आणि घाम आपल्या चेहऱ्यावर जमा होतो. तज्ज्ञांच्या मते, जर हा थर रात्री तसाच राहिला तर त्वचेची छिद्रे बंद होतात, ज्यामुळे त्वचा मोकळा श्वास घेऊ शकत नाही. दिवसभर चेहऱ्यावर साचलेले अतिरिक्त तेल आणि बॅक्टेरिया रात्रीच्या वेळी त्वचेमध्ये संसर्ग निर्माण करू शकतात. यामुळे चेहऱ्यावर मुरुम (Acne) आणि पिंपल्स येण्याची शक्यता दुप्पट होते.

4 / 6
प्रदूषणातील फ्री रॅडिकल्स (Free Radicals) त्वचेच्या संपर्कात आल्यामुळे त्वचेतील कोलॅजनचे नुकसान होते. रात्री चेहरा न धुतल्यास चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या आणि फाईन लाईन्स दिसू लागतात, ज्यामुळे व्यक्ती वयापेक्षा मोठी दिसू शकते.

5 / 6
टीप: वरील माहिती सामान्य वैद्यकीय अहवाल आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यावर आधारित आहे. तुम्हाला काही ॲलर्जी असल्यास त्वचातज्ज्ञांचा (Dermatologist) वैयक्तिक सल्ला नक्की घ्या.

टीप: वरील माहिती सामान्य वैद्यकीय अहवाल आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यावर आधारित आहे. तुम्हाला काही ॲलर्जी असल्यास त्वचातज्ज्ञांचा (Dermatologist) वैयक्तिक सल्ला नक्की घ्या.

6 / 6
Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात