PHOTO | ‘आपलं कुटुंब, आपला सोहळा’, पाहा रेड कार्पेटवर कलाकारांचा ग्लॅमरस अंदाज!

Harshada Bhirvandekar

|

Updated on: Mar 19, 2021 | 3:44 PM

या पुरस्कारांचं हे पहिलंच वर्ष आहे. ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये नुकताच हा रंगारंग सोहळा पार पडला. स्टार प्रवाहच्या कुटुंबातील सर्वच सदस्यांनी या खास सोहळ्याला हजेरी लावली होती.

Mar 19, 2021 | 3:44 PM
मराठी परंपरा, मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य जपणाऱ्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने प्रेक्षकांची मनं जिंकत नंबर वन हे बिरुद कायम ठेवलं आहे.

1 / 7
दर्जेदार कार्यक्रमांच्या माध्यमातून रसिकांना मनोरंजनाची पर्वणी देणाऱ्या या वाहिनीवर लवकरच ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार’ पाहायला मिळणार आहे.

2 / 7
स्टार प्रवाह परिवार पुरस्कारांचं हे पहिलंच वर्ष आहे. ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये नुकताच हा रंगारंग सोहळा पार पडला. स्टार प्रवाहच्या कुटुंबातील सर्वच सदस्यांनी या खास सोहळ्याला हजेरी लावली होती.

3 / 7
रेड कार्पेटवरचा कलाकारांचा ग्लॅमरस अंदाज लक्ष वेधणारा होता. एरव्ही स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकांमधील या लोकप्रिय कलाकारांना त्यांच्या व्यक्तिरेखेमध्ये आपण भेटत असतो.

4 / 7
पण, स्टार प्रवाह परिवार पुरस्काराच्या निमित्ताने या सर्व कलाकारांचा अनोखा अंदाज भाव खाऊन गेला. रविवार 4 एप्रिलला संध्याकाळी 7 वाजता हा दैदिप्यमान सोहळा ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

5 / 7
परिवार असतो जिवाभावाचा, प्रेमाचा आणि विश्वासाच्या घट्ट नात्यांचा. जेव्हा सारे एकत्र येतात तेव्हा सोहळा होतो आनंदाचा, आपुलकीचा आणि कौतुकाचा. स्टार प्रवाहच्या कुटुंबाचा हा कौतुक सोहळा म्हणजे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी असणार आहे.

6 / 7
खुमासदार सूत्रसंचालन, धमाकेदार परफॉर्मन्सेस आणि विनोदी आतषबाजीने परिपूर्ण असा हा सोहळा प्रेक्षकांना घरबसल्या पाहायला मिळणार आहे.

7 / 7

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI