PHOTO : ‘हे’ 5 कॅलरीयुक्त फूड्स आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर !

वजन कमी करण्यासाठी लोक कॅलरीयुक्त आहार घेणे टाळतात. मात्र, काही कॅलरीयुक्त पदार्थ आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप फायदेशीर असतात.

1/5
वजन कमी करण्यासाठी लोक कॅलरीयुक्त आहार घेणे टाळतात. मात्र, काही कॅलरीयुक्त पदार्थ आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप फायदेशीर असतात. बटरमध्ये कॅलरीचे प्रमाण जास्त असते.1 चमचा बटरमध्ये 100 कॅलरीज असतात. बटरमध्ये प्रथिने, फायबर, निरोगी चरबी आणि फायटोन्यूट्रिएंटसुद्धा असतात. यामुळे बटरचा आहारात समावेश केला पाहिजे.

2/5
सब्जाच्या बियांमध्ये उच्च फायबर, ओमेगा -3, प्रथिने आणि झिंक असते. हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. तसेच यामध्ये अँटी-ऑक्सीडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी देखील असतात. मात्र, यामध्ये कॅलरी जास्त असतात. एक चमचे सब्जामध्ये 70 कॅलरी असतात.

3/5
ऑलिव्ह ऑइल मोनोसॅच्युरेटेड फॅटचे स्रोत आहे, जे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहे. याव्यतिरिक्त यामध्ये ओमेगा -6, ओमेगा -3, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के असते. ऑलिव्ह ऑइलमध्ये कॅलरी आणि चरबी देखील जास्त असते. एक चमचे ऑलिव्ह ऑइलमध्ये 120 कॅलरी आणि 14 ग्रॅम चरबी असते.

4/5
पनीरमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, झिंक सुद्धा मुबलक प्रमाणात असतं. पनीर खाणं सर्वांसाठी आरोग्यदायी असतं. मात्र, पनीरमध्ये कॅलरी मोठ्या प्रमाणात असतात.

5/5
आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी सोबतच कॉपर, झिंक, पोटॅशियमसारखे अनेक मिनरल्स असतात. जे आपल्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहेत. मात्र, आंब्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरी असतात. यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI