AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Police : रामनवमी दिवशी हिंसाचार भडकावल्याप्रकरणी मुंबईत 6 गुन्हे दाखल, विविध प्रकरणात 61 जण ताब्यात

रामनवमी दिवशी (Ram Navami) जातीय तेढ निर्माण केली होईल किंवा हिंसाचार भडकावणे यावर पोलिसांची (Mumbai Police) बाकारईने नजर होती. मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात राजकारण (Politics) अधिक गरम झाल्याचं पाहायला मिळत आहे. रामनवमीच्या दिवशी पोलिसांनी सहा गुन्हे दाख ल केल्याची माहिती जाहीर केली आहे.

Mumbai Police : रामनवमी दिवशी हिंसाचार भडकावल्याप्रकरणी मुंबईत 6 गुन्हे दाखल, विविध प्रकरणात 61 जण ताब्यात
रामनवमी दिवशी हिंसाचार भडकावल्याप्रकरणी 6 गुन्हे दाखलImage Credit source: twitter
| Updated on: Apr 18, 2022 | 2:10 PM
Share

मुंबईरामनवमी दिवशी (Ram Navami) जातीय तेढ निर्माण केली होईल किंवा हिंसाचार भडकावणे यावर पोलिसांची (Mumbai Police) बाकारईने नजर होती. मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात राजकारण (Politics) अधिक गरम झाल्याचं पाहायला मिळत आहे. रामनवमीच्या दिवशी पोलिसांनी सहा गुन्हे दाख ल केल्याची माहिती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे विविध पोलिस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मानखुर्द येथे दोन गटात झालेल्या हाणमारीत पोलिसांनी तब्बल 30 जणांना ताब्यात घेतले आहे. मुंबईत विविध प्रकरणांमध्ये आत्तापर्यंत 61 जणांना ताब्यात घेतले आहे. मुंबई पोलिस अजून कसून चौकशी करीत आहेत. त्यामुळे अजून काही जणांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे.

मुंबई पोलिसांचं बारकाईने लक्ष

गुढी पाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढण्याचा इशारा दिला. नाहीतर आम्ही सुध्दा मशिदीच्या समोर हनुमान चाळिसा भोंग्यावरती लावणार असं जाहीर केलं. त्याचे पडसाद दुसऱ्या दिवशी घाटकोपरमध्ये पाहायला मिळाले. तेव्हापासून मुंबईत पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. प्रत्येक गोष्टीवर मुंबई पोलिसांनी लक्ष ठेवल्याने विविध पोलिस स्टेशनमध्ये 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मानखुर्दमध्ये दोन गटात राडा

रविवारी काढण्यात आलेल्या रामनवमीच्या मिरवणुकीवरून मानखुर्द येथील म्हाडा कॉलनीजवळ दोन समुदायांमध्ये झालेल्या भांडणात दोन जण किरकोळ जखमी झाले. 25 ते 30 वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. मानखुर्द पोलिसांनी दोन्ही गटातील सदस्यांविरुद्ध दोन एफआयआर नोंदवून सात जणांना अटक केली. रविवारी रात्री उशिरा तरुणांचा एक गट ‘जय श्री राम’ म्हणत रामनवमीच्या मिरवणुकीतून घरी परतत असताना ही घटना घडली. पोलिसांनी सांगितले की, जेव्हा ते अल्पसंख्याक बहुल भागातून गेले तेव्हा काही स्थानिकांनी विरोध केला आणि दोन गटांमध्ये वाद आणि मारामारी झाली होती.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.