AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhijeet Dipke: अभिजीत दीपके यांनी घेतला मोठा निर्णय, थेट मनोज जरांगे पाटील यांना भेटणार

Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. आता या भेटीमध्ये नेमकं काय घडणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Abhijeet Dipke: अभिजीत दीपके यांनी घेतला मोठा निर्णय, थेट मनोज जरांगे पाटील यांना भेटणार
Jarange and DipkeImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Aug 16, 2026 | 12:07 PM
Share

नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेल्या आंदोलनानंतर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके हे चांगलेच चर्चेत आहेत. देशभरातील विद्यार्थ्यांनी अभिजीत दीपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यानंतर आता अभिजीत दीपके यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जाणार आहेत.

रुग्णालयता भेटीसाठी जाणार अभिजीत दीपके

गेल्या दोन-तीन दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. त्यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज घेत माध्यमांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी आज अंतरवाली सराटी येथे अभ्यासकांची बैठक घेतल्यानंतर पुन्हा रुग्णालयात दाखल होण्याची तयारी केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्यानंतर अभिजीत दिपके गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांची भेट घेणार आहेत.

यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी सीजेपीच्या आंदोलनाला दिल्लीत जाऊन पाठिंबा दिला होता. त्यामुळे ही भेट विशेष महत्त्वाची ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. ही भेट संध्याकाळी होणार असल्याने याबाबत अधिक माहिती नंतर समोर येण्याची शक्यता आहे. तसेच मनोज जरांगे पाटील आणि अभिजीत दीपके यांच्या भेटीत नेमकं काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबत

शुक्रवारी रात्री उशिरा अचानक त्रास होऊ लागल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पण आज महत्त्वाची बैठक असल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला. पण ही बैठक झाल्यानंतर त्यांना पुन्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, अभिजीत दीपके त्यांची भेट घेणार आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच