आधी Divider in Chief आता Modi Has United India, ‘टाईम’ची कोलांटउडी!

नवी दिल्ली : अमेरिकेच्या प्रसिद्ध ‘टाईम’ (TIME) मासिकाने निवडणुकीदरम्यान आपल्या कव्हर पेजवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख ‘डिव्हायडर इन चीफ’ असा केला होता. मात्र निवडणुकीच्या विजयानंतर ‘टाईम’ (TIME) मासिकाने यू-टर्न घेत Modi Has United India असं म्हटलं आहे. या प्रकरणानंतर टाईम मॅगझिनला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केलं जात आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगप्रसिद्ध अमेरिकन मासिक […]

आधी Divider in Chief आता Modi Has United India, 'टाईम'ची कोलांटउडी!
Follow us
| Updated on: May 29, 2019 | 2:02 PM

नवी दिल्ली : अमेरिकेच्या प्रसिद्ध ‘टाईम’ (TIME) मासिकाने निवडणुकीदरम्यान आपल्या कव्हर पेजवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख ‘डिव्हायडर इन चीफ’ असा केला होता. मात्र निवडणुकीच्या विजयानंतर ‘टाईम’ (TIME) मासिकाने यू-टर्न घेत Modi Has United India असं म्हटलं आहे. या प्रकरणानंतर टाईम मॅगझिनला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केलं जात आहे.

लोकसभा निवडणुकीदरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगप्रसिद्ध अमेरिकन मासिक ‘टाईम’ने ‘इंडियाज डिव्हायडर इन चीफ’ असे संबोधले होते. निवडणुकीदरम्यान ‘टाईम’ मासिकाच्या नव्या आवृत्तीच्या कव्हरपेजवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चित्र छापण्यात आलं होतं. या फोटोला ‘ इंडियाज डिव्हायर इन चीफ’ असे कॅप्शन देण्यात आलं होतं. टाईमच्या या कव्हरपेजवरुन आता मोठा वाद निर्माण झाला होता. त्याशिवाय सोशल मीडिया आणि वेबसाईटवरुन ‘टाईम’ने पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भातील स्पेशल रिपोर्ट पोस्ट केला होता.

यानंतर लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर टाईम मासिकाने यु-टर्न घेतला आहे. निवडणुकीनंतर टाईम मासिकाने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापला आहे. या फोटोला ‘Modi Has United India Like No Prime Minister in Decades’ असे कॅप्शन दिले आहे. याचा अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताला अशाप्रकारे एकसंध बनवले आहे. जे दशकातील कोणत्याही पंतप्रधानाला जमले नाही, असं म्हटलं आहे.

त्याशिवाय टाईम मासिकात याबाबत एक स्पेशल रिपोर्टही छापण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये पंतप्रधान मोदी देशात पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यास यशस्वी झाले आहे. त्याशिवाय ‘मोदींनी जाती धर्मातील वाद मिटवले आणि त्यामुळे मोदींना बहुमत मिळाले’ असेही यात म्हटलं. मनोज लडवा नावाच्या लेखकांनी  हा लेख लिहिला आहे.

या लेखात पंतप्रधान नरेंद्र मोदींची फार कौतुक केलं आहे. पंतप्रधान मोदी निवडणूक कसे जिंकले याबाबतही यात स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. “मोदींच्या विजयी होण्यामागे मागासवर्गीय मतांचा फार मोठा वाटा आहे. पंतप्रधान मोदींनी निवडणूक जिंकण्यांसाठी ज्या रणनिती आखल्या, त्यामुळे ते विजयी झालेत,  असे या लेखात म्हटलं आहे. त्याशिवाय पंतप्रधान मोदींनी फक्त हिंदू समाजासह इतर समाजालाही गरिबीतून बाहेर काढलं आहे”, असे यात म्हटलं आहे.

“पंतप्रधान मोदी एका गरीब घरातील असूनही त्यांनी देशातील सर्वोत्तम पदावर जागा मिळवली आहे. गांधी परिवारासोबत राजकीय लढाई लढले असेही या लेखात लिहिलं आहे,” दरम्यान यानंतर पुन्हा  नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

मोदी ‘डिव्हायडर इन चीफ’, ‘टाईम’ मासिकाच्या कव्हरपेजची जगभर चर्चा

TIME मासिकात मोदींचा ‘डिव्हायडर इन चीफ’ उल्लेख, आता मोदी म्हणतात….

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.