AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्डिले-जगताप-कोतकर, नात्यागोत्याचं नगरचं राजकारण

अहमदनगर:  अहमदनगर शहर कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतं. इथल्या सोयऱ्या-धायऱ्यांच्या राजकारणाची नेहमीच चर्चा असते. त्याची अनुभूती नगर महापालिका निवडणुकीत सर्वांनी घेतली. नगरचे राजकारण हे तीन परिवांच्या अवती-भोवती फिरत असतं. कोतकर-जगताप आणि कर्डिले हे सर्वच वेगवेगळ्या पक्षात आहेत. प्रत्यक्षात मात्र सर्वच एकत्र आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. […]

कर्डिले-जगताप-कोतकर, नात्यागोत्याचं नगरचं राजकारण
| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM
Share

अहमदनगर:  अहमदनगर शहर कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतं. इथल्या सोयऱ्या-धायऱ्यांच्या राजकारणाची नेहमीच चर्चा असते. त्याची अनुभूती नगर महापालिका निवडणुकीत सर्वांनी घेतली. नगरचे राजकारण हे तीन परिवांच्या अवती-भोवती फिरत असतं. कोतकर-जगताप आणि कर्डिले हे सर्वच वेगवेगळ्या पक्षात आहेत. प्रत्यक्षात मात्र सर्वच एकत्र आहेत.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून अरुण जगताप यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

कसं आहे सोयऱ्या-धायऱ्यांचं राजकारण?

भाजप आमदार शिवाजी कार्डिलेंचे मोठे जावई संदीप कोतकर काँग्रेसचे माजी महापौर, तर कर्डिलेंची मुलगी सुवर्णा कोतकर यादेखील काँग्रेसच्या माजी उपमहापौर आणि सध्या नगरसेविका आहेत.

कार्डिलेंचे दुसरे जावई संग्राम जगताप हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. तर कर्डिलेंची दुसरी मुलगी शीतल जगताप देखील नगरसेविका आहेत.

आता तिसऱ्या मुलीनेही राजकारणात प्रवेश केलाय. कर्डिले यांचे तिसरे जावई अमोल गाडे, आता त्याची पत्नी ज्योती गाडे या शिवसेनेच्या गाडे परिवारातील असून राष्ट्रवादीकडून निवडणूक आल्या आहेत.

वाचा – अहमदनगरमध्ये सासऱ्याची जावयाशी युती, तिसऱ्या नंबरवरील भाजपचा महापौर

शिवाजी कर्डिले हे राहुरी मतदारसंघाचे आमदार असून नगर तालुक्यतील बुऱ्हानगर भागात राहतात. मात्र त्यांचे काही मतदार हे नगर तालुक्यात आणि शहराच्या काही भागात येतात. त्यामुळे नगर शहराच्या राजकारणात त्यांचं मोठं वर्चस्व मानलं जातं. तर त्यांचे व्याही भानुदास कोतकरांचे केडगाव भागात वर्चस्व आहे. गेल्या 40 वर्षांपासून केडगाव परिसरात कोतकर कुटुंबाची दहशत आहे. भानुदास कोतकर यांना तीन मुलं आहेत, तर मोठ्या मुलाची पत्नी ही कर्डिले यांची मुलगी आहे. त्यामुळे कोतकर कोणत्याही पक्षात असले तरी त्याला आतून कर्डिलेंचा पाठींबा असतोच, अशी चर्चा शहरात नेहमीच असते.

वाचा- पक्षाच्या आदेशाला केराची टोपली, नगरमध्ये राष्ट्रवादी नगरसेवकांची भाजपला मतं

बाजार समितीच्या राजकारणात कर्डिले आणि कोतकर हे आपल्या हातात सत्ता रहावी यासाठी आपल्या सोयीनुसार राजकारण करतात. महापालिका निवडणुकीत देखील कार्डिलेंचे दुसरे व्याही आमदार अरुण जगताप यांचं वर्चस्व होतं. त्यामुळे महापालिका निवडणुकीत कर्डिले आणि जगताप यांची छुपी युती असल्याची चर्चा शहरात नेहमीच असते. त्यामुळे पक्ष कोणतेही असो, किंगमेकारच्या भूमिकेत कर्डिलेंचंच नाव पुढे येत असतं.

या सोयऱ्या-धायऱ्यांच्या राजकारणाचा फायदा शिवसेनेने नेहमीच घेतलाय, असं राजकीय विश्लेषक सांगतात. गेल्या 25 वर्षांपासून शिवसेना एकाच मुद्द्यावर निवडणूक लढत आहे. हे शहर भयमुक्त झालं पाहिजे हा एकच नारा शिवसेना नेहमी देत असते. शहराचे माजी आमदार अनिल राठोड यांनी 25 वर्षात भावनिक राजकारण करून निवडूनका जिंकल्या आहेत. तसेच गेल्या सात महिन्यांपूर्वी पोटनिवडणुकीच्या वादातून दोन शिवसैनिकांची हत्या झाली. त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरण, त्यामुळे या सर्वांचं भांडवल करून पुन्हा शिवसेना भावनिक राजकारण करणार हे निश्चित आहे. मात्र या सर्वच राजकारणात नगरचा विकास खुंटतोय. त्यामुळे ही निवडणूक किमान विकासाच्या मुद्द्यावर व्हावी, अशी इच्छा नागरिकांची आहे.

शिवाजी कर्डिले

भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचा नगरमध्ये बोलबाला आहे. कर्डिले यांना तीन मुली आहेत. पहिली मुलगी कोतकरांच्या घरात, तर दुसरी जगतापांच्या घरात आणि तिसरी मुलगी शिवसेनेच्या गाडे परिवारात दिली आहे. त्यामुळे हे तीनही परिवार राजकारणात कोणत्याही पक्षाचे असले तरी राजकीय स्वार्थासाठी आतून एकत्रच असतात. यात नेहमीच किंगमेकरच्या भूमिकेत असतात ते आमदार शिवाजी कर्डिले. 

महापौर निवडणुकीत नेमकं काय झालं?

भाजपने राष्ट्रवादी काँग्रेससोबत अभद्र युती करत, महापौरपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. महापालिका निवडणुकीत शिवसेना 24 जागांसह पहिल्या क्रमांकावर होती, मात्र भाजपने स्वत:चे 14 अधिक दुसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादीचे 18 तसंच बसपाचे 4 आणि अपक्ष 1 असा मिळून 37 जागांचं बळ पदरात पाडून घेतलं. त्यामुळे भाजपचे बाबा वाकले महापौरपदी विजयी झाले. त्यांना 37 मते मिळाली. तर शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे यांना 23 मते मिळाली.

नगरमधील राजकीय समीकरणे

अहमदनगर दक्षिण मतदारसंघ हा खरं तर आघाडीचा बालेकिल्ला. सहकार साखर कारखानदारी, दूध व्यवसाय, शिक्षण संस्था आणि सहकाराचं घट्ट जाळं या मतदारसंघावर आहे. मात्र खासदार दिलीप गांधी यांनी गटबाजीचा फायदा घेत भाजपाचं खातं खोललं. गेल्या दोन टर्मपासासून ते खासदार आहेत. आघाडीत राष्ट्रवादीकडून ही जागा 2014 ला लढवण्यात आली. पण मोदी लाटेत गांधींच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा सुपडासाफ झाला.

अहमदनगर दक्षिण मतदारसंघ अत्यंत संवेदनशील मतदारसंघ आहे. या मतदारसंघात विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात. एक खासदार आणि तीन आमदारांसह भाजपचं प्राबल्य आहे. राष्ट्रवादी तीन आमदारांसह दुसर्‍या स्थानावर, तर शिवसेना आणि काँग्रेस एका आमदारासह तिसर्‍या स्थानी आहे.

मतदारसंघानुसार पक्षीय बलाबल

राहुरी – शिवाजी कर्डीले, भाजप

शेवगाव-पाथर्डी – मोनिका राजळे, भाजप

कर्जत – जामखेड – राम शिंदे, भाजप

नगर शहर – संग्राम जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस

पारनेर – विजय औटी, शिवसेना

श्रीगोंदा – राहुल जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस

कोण आहेत अरुण जगताप?

  • अरुण जगताप हे राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे विद्यमान आमदार आहेत
  • राष्ट्रवादीचे विधानसभेचे आमदार संग्राम जगताप यांचे ते वडील आहेत.
  • भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांची मुलगी ही संग्राम जगताप यांची पत्नी आहे
  • नगर महापालिका निवडणुकीत केडगावमध्ये शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडात या सर्वांवर गुन्हा दाखल झाला होता.
  • त्यावेळी आमदार संग्राम जगताप यांना अटक झाली होती तर अरुण जगताप पसार होते
  • अरुण जगताप यांनी विधानपरिषद निवडणुकीदरम्यान सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपलं शिक्षण चौथी पास इतकं दिलं आहे.

संबंधित बातम्या

 अहमदनगर : तीन मुली तीन पक्षात, म्हणूनच कर्डिले किंगमेकर!  

अहमदनगर लोकसभा : भाजपातूनच विरोध, यावेळी खा. दिलीप गांधींचं काय होणार? 

पक्षाच्या आदेशाला केराची टोपली, नगरमध्ये राष्ट्रवादी नगरसेवकांची भाजपला मतं  

किंगमेकर शिवाजी कर्डिलेंच्या दोन्ही मुलींचा निकाल लागला!    

अहमदनगर महापालिकेचा अंतिम निकाल 

नगरमधील शिवसैनिकांची हत्या : माजी महापौर संदीप कोतकर कोर्टात हात जोडून ढसाढसा रडला!

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.