AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आर आर पाटलांच्या पोलीस भावाचा सत्कार, आबांच्या आठवणींनी अजितदादा गहिवरले

आर. आर. आबा यांचे बंधू राजाराम पाटील यांची पिंपरी पोलिस आयुक्तालयातून कोल्हापूरला बदली झाली (Ajit Pawar R R Patil brother)

आर आर पाटलांच्या पोलीस भावाचा सत्कार, आबांच्या आठवणींनी अजितदादा गहिवरले
अजित पवार यांच्या हस्ते राजाराम पाटलांचा सत्कार
| Updated on: Feb 05, 2021 | 1:54 PM
Share

पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री आर. आर. पाटील (R R Patil) यांची आठवण पक्षातील सहकाऱ्यांकडून नेहमीच काढली जाते. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनाही पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यात आबांची आठवण झाली. निमित्त ठरलं ते आबांचे सख्खे बंधू राजाराम पाटील (Rajaram Patil) यांच्या सत्काराचं. (Ajit Pawar felicitates R R Patil brother Rajaram Patil in Pimpri)

“आबा लवकर सोडून गेले”

आर. आर. आबा यांचे बंधू राजाराम पाटील यांची पिंपरी पोलिस आयुक्तालयातून कोल्हापूरला बदली झाली आहे. त्यानिमित्त अजित पवार यांच्या हस्ते राजाराम पाटलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाशही उपस्थित होते. सत्कारानंतर भाषण करताना अजित पवार यांनी आर. आर. पाटील यांची आठवण काढली. आबा आपल्याला लवकर सोडून गेले, असं म्हणताना अजितदादा काहीसे गहिवरले.

राजाराम पाटलांनी गैरफायदा घेतला नाही

“भाऊ गृहमंत्री असूनही राजाराम पाटील यांनी त्याचं कधीच भांडवल केलं नाही. नाही तर काही जणांचा लांबचा पाहुणा गृहमंत्री असला, तरी तो पोलिस आयुक्तालय चालवतो, मात्र राजाराम पाटील यांनी कधीच गैरफायदा घेतला नाही” अशा शब्दात अजित पवारांनी राजाराम पाटील यांचे कौतुक केले.

राष्ट्रपती पोलिस पदकाने दोनदा गौरव

सहाय्यक पोलिस आयुक्तपदी सेवा बजावताना राजाराम पाटील यांना 15 ऑगस्ट 2019 रोजी राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले होते. उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलिस पदक मिळाले आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती शौर्य पदक, पोलिस शौर्य पदक, उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक तर गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलिस पदक जाहीर करण्यात येतात. राजाराम रामराव पाटील जवळपास दोन वर्षांपासून सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात कार्यरत होते. (Ajit Pawar felicitates R R Patil brother Rajaram Patil in Pimpri)

आबांची राजकीय कारकीर्द

आर आर पाटील हे 1991 ते 2015 या काळात सांगलीतील तासगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार होते.  2009 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात ते दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे गृहमंत्री झाले. त्यांनी उपमुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. 16 फेब्रुवारी 2015 रोजी मुंबईतील लीलावती रुग्णालयात मुखाच्या कर्करोगाशी लढताना त्यांची प्राणज्योत मालवली.

संबंधित बातम्या :

आर. आर. पाटील यांचे बंधू राष्ट्रपती पोलिस पदकाचे मानकरी

(Ajit Pawar felicitates R R Patil brother Rajaram Patil in Pimpri)

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.