मी राज्याचा उपमुख्यमंत्री, तुम्ही कोणाबद्दल विचारताय, अजित पवारांचा अनुल्लेखाने पडळकरांना टोला

मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे, तुम्ही कोणाबद्दल विचारताय, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा अनुल्लेख केला.

मी राज्याचा उपमुख्यमंत्री, तुम्ही कोणाबद्दल विचारताय, अजित पवारांचा अनुल्लेखाने पडळकरांना टोला
अजित पवार आणि गोपीचंद पडळकर


पुणे : मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे, तुम्ही कोणाबद्दल विचारताय, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा अनुल्लेख केला. ते पुण्यात बोलत होते. पुण्यात वीकेंड लाकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यावेळी अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन विविध प्रश्नांना उत्तरं दिली. (Ajit Pawar on Gopichand Padalkar , I am the Deputy Chief Minister of the state, who are you asking about )

यावेळी अजित पवारांना गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवार म्हणाले, “मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे ,तुम्ही कोणाबद्दल विचारताय? बारामतीकरांनी ज्याचं डिपॉझिट जप्त केलंय, त्याविषयी काय बोलणार? लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवली आहे”

बारामतीत जाऊन पडळकरांचं पवारांवर टीकास्त्र

भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे आज बारामती दौऱ्यावर आहेत. त्यांनी बारामतीत येऊन पवारांवर तोफ डागली. “फुले, शाहू, आंबेडकर यांच्या खऱ्या वारसदारांच्या संवैधानिक हक्कांवर गदा आणण्याचे आणि त्यांचा गळा घोटण्याचे महापाप पवारांच्या नेतृत्वाखाली या महाविकास आघाडी सरकारने केलं आहे. बारामतीकरांनो पवारांच्या गुलामगिरीतून मुक्त व्हा” असा हल्लाबोल पडळकर यांनी केला.

गोपीचंद पडळकरांनी आज बारामती दौऱ्यावर बारामतीच्या विविध भागात वंजारी,तेली, शिंपी, माळी, रामोशी सामाज्याच्या घोंगड्या बैठका सुरु केल्या आहेत.

अजित पवारांकडून पुण्यात वीकेंड लॉकडाऊनची घोषणा 

शनिवार आणि रविवारी पुणे जिल्ह्यात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. या गर्दीला चाप लावण्यासाठी पुण्यात विकेंड लॉकडाऊन लावण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज केली. पुण्यात शनिवार-रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार असल्याचंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं. तसेच पुण्यातून बाहेर फिरायला जाणाऱ्यांना पुन्हा पुण्यात आल्यावर 15 दिवसांसाठी क्वॉरंटाईन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

VIDEO : गोपीचंद पडळकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल 

संबंधित बातम्या  

बारामतीकरांनो, पवार घराण्याच्या गुलामगिरीतून मुक्त व्हा: गोपीचंद पडळकर

Pune Weekend Lockdown : फिरायला जाणाऱ्यांना 15 दिवस क्वारंटाईन करणार, अजित पवारांचा पुणेकरांना इशारा   

Pune Weekend Lockdown : पुण्यात वीकेंड लॉकडाऊन, तिसरी लाट थोपवण्याचा निर्धार

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI