तिघं एकत्र आले, तर विरोधात कोण ‘माय का लाल’ निवडून येत नाही : अजित पवार

'ए'चा आमदार फुटला, तर 'ए' पक्ष जो उमेदवार देईल, त्याला 'बी' आणि 'सी' पाठिंबा देतील. चार पक्षातील तीन पक्ष एकत्र आले, तर कोण माय का लाल निवडून येणार नाही." असं अजित पवार यांनी ठणकावून सांगितलं.

तिघं एकत्र आले, तर विरोधात कोण 'माय का लाल' निवडून येत नाही : अजित पवार

मुंबई : चार पक्षातील तीन पक्ष एकत्र आले तर कोण माय का लाल निवडून येणार नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार यांनी केलं. आमदार फुटण्याची चर्चा रंगल्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी (Ajit Pawar on Rebel) नारायण राणेंना प्रत्युत्तर दिलं.

भाजपच्या सत्तेसाठी सर्वतोपरी मदत करणार आहे. लवकरच 145 आमदारांची जुळवाजुळव करुन सत्तास्थापनेसाठी भाजपला मदत करणं हे माझं कर्तव्य आहे, असं नारायण राणे यांनी म्हटलं होतं.

“निवडणूक झाली झाली त्या दिवसाची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात जमीन-आस्मानचा फरक आहे, हे कोणी नाकारुच शकत नाही. सर्व आमदार आपापल्या पक्षासोबतच राहतील. कोणी काही करणार नाही. आम्ही एक ठरवलेलं आहे. जर एखाद्या पक्षातील एखाद्या आमदाराने कुठल्या दबावाखाली वेगळी राजकीय भूमिका घेतली, तर तिथे निवडणूक लागली. जर ए, बी, सी हे तीन पक्ष असतील. ‘ए’चा आमदार फुटला, तर ‘ए’ पक्ष जो उमेदवार देईल, त्याला ‘बी’ आणि ‘सी’ पाठिंबा देतील. चार पक्षातील तीन पक्ष एकत्र आले, तर कोण माय का लाल निवडून येणार नाही.” असं अजित पवार यांनी ठणकावून सांगितलं.

पहिली अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री, मग राष्ट्रवादीचा, 5 वर्ष काँग्रेसचा उपमुख्यमंत्री?

यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीच्या बैठकीआधी प्रसारमाध्यमांशी अजित पवार बोलत होते. वेतनासाठी कोणीही आमदार होत नाही, समाजकल्याणासाठी लोकं आमदार होतात, असंही ते यावेळी म्हणाले.

आधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये किमान सामायिक कार्यक्रमावर एकवाक्यता होईल. महत्त्वाच्या पदांवर चर्चा होईल. अधिवेशनाआधी हायकमांडना महाराष्ट्रातील चर्चा संपवायची आहे. त्यानंतर शिवसेनेबाबत चर्चा करण्याबाबत ठरवणार, असंही अजित पवारांनी (Ajit Pawar on Rebel) सांगितलं.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI