वडिलांचा राजीनामा, अजित पवारांचा धाकटा मुलगा पूरग्रस्त दौऱ्यावर, जय पवार म्हणतात….

अजित पवारांचा लहान मुलगा जय पवार यांनी टीव्ही 9 मराठीवर प्रतिक्रिया दिली. अजित पवारांनी राजीनामा देण्यापूर्वी  त्यांनी पूरपरिस्थितीबाबत माहिती दिली.

वडिलांचा राजीनामा, अजित पवारांचा धाकटा मुलगा पूरग्रस्त दौऱ्यावर, जय पवार म्हणतात....
सचिन पाटील

|

Sep 27, 2019 | 8:21 PM

मुंबई : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar resigns) यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अजित पवारांच्या (Ajit Pawar resigns) राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीसह सर्वच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अजित पवारांनी (Ajit Pawar resigns) विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांना फोन करुन राजीनामा मंजूर करण्याचा आग्रह केला. राजीनामा योग्य फॉरमॅटमध्ये असल्याने तो मंजूर केल्याचं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं.

अजित पवारांचा लहान मुलगा जय पवार (Jay Ajit Pawar) यांनी टीव्ही 9 मराठीवर प्रतिक्रिया दिली. अजित पवारांनी राजीनामा देण्यापूर्वी  त्यांनी पूरपरिस्थितीबाबत माहिती दिली.

पुरामुळे बारामतीतील लोकांचं मोठं नुकसान झालं आहे. लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. घरं, धान्याचं नुकसान झालं आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मदत करत आहेत. मी पाच वर्षापूर्वी दादांसाठी प्रचार केला होता, तसंच यावर्षीही मी दादांसाठी प्रचार करणार, असं जय पवार यांनी सांगितलं.

अजित पवारांचा राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar resigns ) यांनी शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी आमदारकीचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी त्यांचा (Ajit Pawar resigns ) राजीनामा मंजूर केला. अजित पवारांचा राजीनामा मंजूर केल्याची माहिती हरिभाऊ बागडे यांनी टीव्ही 9 मराठीला दिली.

गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले?

“अजित पवारांनी राजीनामा का दिला हे मलाही कळत नाही. त्यांच्यात घरातले वाद आहेत की पक्षातले वाद आहेत का, हे तेच सांगू शकतील. आताच निवडणुकीचे फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे. अजित पवार साताऱ्यातूनही लोकसभा लढवण्याची शक्यता कमी आहे. जरी ते लढणार असतील तरी आमदारकीच्या राजीनाम्याची गरज नाही. पण खरं कारण तेच सांगू शकतात. अजितदादा माझ्या संपर्कात नाहीत, ना मी त्यांच्या संपर्कात आहे. त्यांना पक्षात घेण्याचाही प्रश्न नाही. पक्षांतर्गत किंवा कौटुंबीक कुरघोड्या आहेत की ही त्यांची स्ट्रॅटेजी आहे, हे मी काही सांगू शकत नाही. हा विषय संभ्रमात टाकणारा आहे”, अशी प्रतिक्रिया भाजप नेते गिरीश महाजन यांनी दिली.

सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया

अजित पवारांच्या राजीनाम्याचं गूढ आहे. विधानसभा समारोपाच्या टप्प्यावर आहे. आता कोणतेही अधिकार नाहीत. आचारसंहिता आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा का दिला, हे कटप्पाने बाहुबलीला क्यू मारा या प्रश्नाइतकंच गूढ आहे. पक्षाची बिकट अवस्था, हताश मनातून, एखादा क्षण येतो वैराग्याचं जीवन जगावं वाटतं, असं कारण असू शकतं. आता राजीनाम्याची गरज नव्हती, अशी प्रतिक्रिया अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें