हरसिमरत कौर बादल सर्वात श्रीमंत मंत्री, फक्त दागिन्यांची किंमत तब्बल....

नवी दिल्ली : अकाली दलच्या खासदार 52 वर्षीय हरसिमरत कौर बादल यांच्याकडे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांची सून आणि अकाली दल प्रमुख सुखबीर सिंह बादल यांची पत्नी असलेल्या हरसिमरत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील सर्वात श्रीमंत मंत्री आहेत. प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांची एकूण संपत्ती 217 …

हरसिमरत कौर बादल सर्वात श्रीमंत मंत्री, फक्त दागिन्यांची किंमत तब्बल....

नवी दिल्ली : अकाली दलच्या खासदार 52 वर्षीय हरसिमरत कौर बादल यांच्याकडे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांची सून आणि अकाली दल प्रमुख सुखबीर सिंह बादल यांची पत्नी असलेल्या हरसिमरत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील सर्वात श्रीमंत मंत्री आहेत. प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांची एकूण संपत्ती 217 कोटी रुपये आहे.

प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार, हरसिमरत कौर यांच्या खात्यात 41 लाख रुपया जमा आहेत. याशिवाय 60 लाख रुपयांचे बाँड, डिबेंचर आणि विविध कंपन्यांचे शेअर्स आहेत. सोबतच 25 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जही त्यांच्या नावावर आहे. हरसिमरत यांना दागिन्यांची प्रचंड आवड असल्याचं बोललं जातं. त्यांच्याकडे तब्बल सात कोटी रुपयांचे दागिने आहेत. विविध ठिकाणी त्यांच्या नावावर 49 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर 18 कोटी रुपयांची व्यावसायिक संपत्ती आहे. 39 कोटी रुपयांची रेसिडेन्शियल आणि 9 कोटी रुपयांची व्यावसायिक संपत्ती आहे.

हरसिमरत कौर या फॅशन डिझायनरही आहेत. दिल्लीतील लॉरेंटो कॉन्वेंट स्कूलमधून त्यांनी दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आणि ड्रेस डिजायनिंगमध्ये पुढील शिक्षण घेतलं. हरसिमरत यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या दोन्ही मुलींनी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला होता.

हरसिमरत कौर या पंजाबमधील बठिंडा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत. मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळातही त्यांच्याकडे अन्न व प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचीच जबाबदारी होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *