राज्यसभेच्या जागेसाठी अमित शाह-फडणवीसांची भेट, उदयनराजेंच्या नावावर सहमती?

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट (Amit shah and devendra fadnavis meet)  घेतली.

Amit shah and devendra fadnavis meet, राज्यसभेच्या जागेसाठी अमित शाह-फडणवीसांची भेट, उदयनराजेंच्या नावावर सहमती?

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट (Amit shah and devendra fadnavis meet)  घेतली. यावेळी या दोघांमध्ये भाजपकडून महाराष्ट्रातील सात राज्यसभेच्या जागेवरील उमेदवारीवर चर्चा झाली. यात माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नावावर अमित शाह आणि फडणवीस यांच्यात सहमती झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मार्च महिन्यात राज्यसभेच्या सात जागांची मुदत संपणार आहे. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील संसद भवनात अमित शाहांची भेट घेतली आहे. या दोघांच्या भेटीत महाराष्ट्रातील सात राज्यसभेच्या जागेवर चर्चा करण्यात आली. त्यात उदयनराजे भोसले यांच्या नावावर शाह आणि फडणवीस यांची सहमती असल्याचं बोललं जातं आहे. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे.

यामुळे सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेले माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजकीय पुनर्वसनाच्या हालचालींना सुरुवात झाल्याची चर्चा रंगली आहे. मार्च महिन्यात राज्यसभेच्या सात जागांची मुदत संपणार आहे. यावेळी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत उदयनराजेंना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. उदयनराजेंची राज्यसभेवर नियुक्ती झाल्यास केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यताही नाकारता येत (Amit shah and devendra fadnavis meet)  नाही.

राष्ट्रवादीचे शरद पवार, अ‍ॅड. माजिद मेमन, काँग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत, भाजपचे अमर साबळे, रिपाइंचे रामदास आठवले आणि अपक्ष संजय काकडे यांच्या राज्यसभा सदस्यत्वाची मुदत मार्च महिन्यात संपत आहे.

राज्यसभेसाठी खुले मतदान असल्याने आघाडीचे पाच आणि भाजपचे दोन उमेदवार सहज निवडून जाऊ शकतात. मात्र निवडणुकीत भाजपने तिसरा उमेदवार दिल्यास सातव्या जागेसाठी सामना रंगणार आहे.

राज्यसभा नियुक्तीसाठी निकष काय?

राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी उमेदवाराला पहिल्या पसंतीची 37 मतं आवश्यक आहेत. त्यामुळे आघाडीचे चार तर भाजपचे दोन उमेदवार सहज निवडून येतील. शिल्लक राहिलेल्या मतांमधून आणखी एक उमेदवार निवडून आणण्याचा आघाडीचा आणि भाजपचा प्रयत्न राहणार (Amit shah and devendra fadnavis meet)  आहे.

संबंधित बातम्या : 

उदयनराजेंच्या राजकीय पुनर्वसनाच्या हालचाली, राज्यसभेचं तिकीट मिळण्याची चिन्हं

उदयनराजे राज्यसभेच्या रेसमध्ये, कोणाचं तिकीट कापणार?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *