नक्षलवाद्यांच्या नाकावर टिच्चून अमित शाहांची गडचिरोलीत सभा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah Gadchiroli rally) हे महाराष्ट्र निवडणुकीच्या निमित्ताने राज्यभरात प्रचारसभा घेत आहेत.

नक्षलवाद्यांच्या नाकावर टिच्चून अमित शाहांची गडचिरोलीत सभा

गडचिरोली :  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah Gadchiroli rally) हे महाराष्ट्र निवडणुकीच्या निमित्ताने राज्यभरात प्रचारसभा घेत आहेत. विविध जिल्ह्यात सभा घेतल्यानंतर, अमित शाह (Amit Shah Gadchiroli rally) यांनी आपला मोर्चा नक्षलग्रस्त भागात वळवला आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभेतील भाजपा उमेदवार राजे अमरिशराव अत्राम (Ambrishrao Raje Satyavanrao Atram ) यांची प्रचारसभा होत आहे. आलापल्ली या ठिकाणी होणाऱ्या या सभेला आज अमित शाह हजर राहणार आहेत.

अहेरी हा नक्षलग्रस्त भाग असल्याने, इथे मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाजपने इथे सभेसाठी जय्यत तयारी केली आहे. आलापल्ली इथल्या क्रीडा संकुलात दुपारी 12 वाजता सभेचं नियोजन आहे.

लोकसभा निवडणुकीवेळीही अमित शहा यांची इथे सभा आयोजित होती. पण हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याने, त्यावेळी सभा रद्द करण्यात आली होती.

कलम 370 नंतर मिशन नक्षलवाद

अमित शाह यांनी देशाच्या गृहमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर, मोदी सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द केलं. त्यानंतर अमित शाह यांनी आपला मोर्चा नक्षलवादाकडे वळवला आहे. त्यासाठी त्यांनी विविध राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकांचं सत्र सुरु केलं आहे. नक्षलवाद मोडून काढण्यासाठी अमित शाहांनी खास प्लॅन केला आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI