“आम्ही सर्व शिवभक्त उदयनराजेंच्या पाठीशी” , मिटकरी यांचा ‘निर्धार शिवसन्मानाचा’ मेळाव्याला पाठींबा

अमोल मिटकरी यांचा 'निर्धार शिवसन्मानाचा' मेळाव्याला पाठींबा...

आम्ही सर्व शिवभक्त उदयनराजेंच्या पाठीशी , मिटकरी यांचा 'निर्धार शिवसन्मानाचा' मेळाव्याला पाठींबा
Follow us
| Updated on: Dec 03, 2022 | 12:46 PM

पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची तुलना थेट शिवरायांशी करण्यात आली. त्यानंतर शिवभक्त आक्रमक झाले आहेत. खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले (Udayanraje Bhonsle) यांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. उदयनराजेंनी काहीवेळा आधीच रायगडावर ‘निर्धार शिवसन्मानाचा’ मेळावा घेतला. त्यांच्या या मेळाव्याला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पाठिंबा दिला आहे.

उदयनराजे यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. त्यांच्या या भूमिकेचं मी एक शिवभक्त म्हणून समर्थन करतो. सर्व शिवभक्त त्यांच्या पाठिशी आहेत. राज्यपालांच्या राजीनाम्यापर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असं मिटकरी म्हणालेत.

जसं संविधान आणि भाजपचा संबंध नाही. तसं भाजप आणि शिवभक्तीचा दूरदूरपर्यंत काही संबंध नाही. त्यामुळे त्यांचे नेते अशी वक्तव्य करतात. पण त्यांची अशी आक्षेपार्ह वक्तव्य महाराष्ट्र खपवून घेणार नाही , असं अमोल मिटकरी म्हणालेत.

महापुरूषांच्या अवमनाविरोधात आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादीच्या इतर नेते आत्मक्लेश आंदोलन करत आहेत.वढू बुद्रुक इथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळावर आत्मक्लेश आंदोलन करण्यात येत आहे. आमदार सुनील टिंगरे, जयदेव गायकवाड, संदीप क्षीरसागर, अशोक पवार, अमोल मिटकरी,नितीन पवार,रुपाली पाटील या आत्मक्लेश आंदोलनात सहभागी झाले आहेत. या आंदोलनावेळी बोलताना अमोल मिटकरी यांनी राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

आज रायगडावर ‘निर्धार शिवसन्मानाचा’ मेळावा त्यांनी घेतला. यावेळी बोलताना त्यांनी पुढच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. पुढचा ‘निर्धार शिवसन्मानाचा’ मेळावा मुंबईच्या आझाद मैदानावर होणार असल्याचं उदयनराजेंनी जाहीर केलंय.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.