देवेंद्र फडणवीस खरंच 35 पुरणपोळ्या खातात का?, अमृता फडणवीस यांनी केला खुलासा

झी मराठीवरच्या किचन कल्लाकार या कार्यक्रमात तअमृता फडणवीस यांनी फडणवीस 35 पुरणपोळ्या पातेलंभर तुपासोबत खात असल्याचं सांगितलं होतं. त्यावरून बरीच चर्चा झाली. त्यांना ट्रोलही केलं गेलं. त्यावर आज अमृता यांनी स्पष्टीकरण दिलं.

देवेंद्र फडणवीस खरंच 35 पुरणपोळ्या खातात का?, अमृता फडणवीस यांनी केला खुलासा
अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: May 01, 2022 | 12:22 AM

मुंबई : मागच्या काही दिवसांपासून राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या खानपानाच्या सवयी चर्चेत आहेत. फडणवीसांची पुरणपोळी खाण्याची सवय अनेकांच्या चर्चेचा विषय होता. झी मराठीवरच्या किचन कल्लाकार या कार्यक्रमात अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) हे 35 पुरणपोळ्यापातेलंभर तुपात बुडवून खात असल्याचं सांगितलं. त्यानंतर या विषयाची जोरदार चर्चा झाली. पण खरंच देवेंद्र फडणवीस 35 पुरणपोळ्या खातात का? त्यांना एवढी पुरणपोळी आवडते का? याचं उत्तर अमृता फडणवीस यांनीच उत्तर दिलंय.

फडणवीसांच्या 35 पुरणपोळ्या खाण्यामागचं खरं सत्य

देवेंद्र फडणवीस हे 35 पुरण पोळ्या खातात असं अमृता फडणवीसांनीच सांगितलं होतं. त्यावर त्यांनीच आज स्पष्टीकरण दिलं आहे. “देवेंद्रजींचा एक जुना मित्र आहे त्याने मला सांगितलं होतं. की लग्नाच्या पंगतीत पैंज लागली होती. त्यात 35 पुरणपोळ्या खायच्या होत्या. त्यांनी त्या खाल्ल्या आणि जिंकले. ही गोष्ट लग्नाआधीची आहे पण लग्नानंतर मी पाहिलंय की ते अर्धी पुरणपोळी पण खात नाहीत”, असं अमृता फडणवीस म्हणाल्या. त्या एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात बोलत होत्या.

अमृता आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये भांडण होण्याचं एकमेव कारण…

“आमच्यात कधीही भांडण होत नाही पण जेव्हापासून मी पुरणपोळीचा किस्सा सांगितला तेव्हापासून लोक यांना जाईल तिथं पुरणपोळी खायला देतात. अन् मग घरी येईन तो सगळा राग ते माझ्यावर काढतात. मग आमची भांडणं होतात”, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

35 पुरणपोळ्यांचा किस्सा

झी मराठीवरच्या किचन कल्लाकार या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी फडणवीस 35 पुरणपोळ्या पातेलंभर तुपासोबत खात असल्याचं सांगितलं होतं. त्यावरून बरीच चर्चा झाली. त्यांना ट्रोलही केलं गेलं. त्यावर आज अमृता यांनी स्पष्टीकरण दिलं.

Non Stop LIVE Update
उडता पंजाब झाला आता उडता महाराष्ट्र होणार का? सुप्रिया सुळे यांची टीका
उडता पंजाब झाला आता उडता महाराष्ट्र होणार का? सुप्रिया सुळे यांची टीका.
मला तिकीट दिलं तर मी जिंकणार..उमेदवार कुणी का असंना - रवींद्र धंगेकर
मला तिकीट दिलं तर मी जिंकणार..उमेदवार कुणी का असंना - रवींद्र धंगेकर.
आव्हाडांनी तुतारी वाजवली पण... अमोल मिटकरी यांनी काय दिले ओपन चॅलेंज?
आव्हाडांनी तुतारी वाजवली पण... अमोल मिटकरी यांनी काय दिले ओपन चॅलेंज?.
ज्या समाजाने देव केलं..तोच उद्या दगडं मारील, बारसकर बरसले
ज्या समाजाने देव केलं..तोच उद्या दगडं मारील, बारसकर बरसले.
'ही अजितदादांची करामत, 40 वर्षांनंतर शरद पवारांना...,' देवेंद्र फडणवीस
'ही अजितदादांची करामत, 40 वर्षांनंतर शरद पवारांना...,' देवेंद्र फडणवीस.
'एकाने तुतारी वाजवायची, एकाने मशाल घेऊन....,' काय म्हणाले संजय शिरसाट
'एकाने तुतारी वाजवायची, एकाने मशाल घेऊन....,' काय म्हणाले संजय शिरसाट.
शरद पवार यांना 'तुतारी', छगन भुजबळ म्हणाले जुनं चिन्हच....
शरद पवार यांना 'तुतारी', छगन भुजबळ म्हणाले जुनं चिन्हच.....
...नाही तर घरी बसा, राहुल नार्वेकर कोणावर संतापले
...नाही तर घरी बसा, राहुल नार्वेकर कोणावर संतापले.
आज त्यांना रायगड आठवला ? राज ठाकरे यांची शरद पवारांवर टीका
आज त्यांना रायगड आठवला ? राज ठाकरे यांची शरद पवारांवर टीका.
'तुताऱ्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा, महाराष्ट्रात...- चंद्रकांत पाटील
'तुताऱ्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा, महाराष्ट्रात...- चंद्रकांत पाटील.