AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऋतुजा लटकेंची उमेदवारी, शिंदे कात्रीत? फायदा की तोटा? 2 कारणं, ज्यावर भविष्य!

एकिकडे सहानुभूतीचं राजकारण तर दुसरीकडे सत्तेसाठी खोके घेतल्याचा आरोप... येणारी प्रत्येक निवडणूक शिंदेंसाठी गुंता वाढवणारी ठरणार. अंधेरी ही लिटमस टेस्ट!

ऋतुजा लटकेंची उमेदवारी, शिंदे कात्रीत? फायदा की तोटा? 2 कारणं, ज्यावर भविष्य!
Image Credit source: social media
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Oct 13, 2022 | 1:29 PM
Share

मुंबईः नारायण राणे असो की छगन भुजबळ… एकदा शिवसेनेतून (Shivsena) बाहेर पडलं की पराभवाचं शुक्लकाष्ठ मागे लागतं. हा इतिहास अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलाय. ठाकरे घराण्यातील राज ठाकरेही (Raj Thackeray) फार भरारी घेऊ शकले नाहीत. त्यामुळेच शिंदे गटाच्या नेत्यांना वारंवार निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचं आव्हान उद्धव ठाकरे गटाकडून देण्यात येतंय. तर आम्ही बाहेर पडल्याने शिवसेना गलितगात्र झाल्याचं शिंदे गटाकडून दर्शवण्यात येतंय. घोडा मैदान सामोर आहे. अंधेरी पूर्व विधानसभा (Andheri East By poll) मतदार संघाची निवडणूक आगामी महापालिका निवडणुकांची लिटमस टेस्ट मानली जातेय.

येथील शिवसेना आमदार रमेश लटके यांचं मे 2022 मध्ये निधन झालं. त्यामुळे पोटनिवडणूक लागली आहे. येत्या ३ नोव्हेंबर रोजी मतदान आहे. उद्या म्हणजेच 14 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीख.

शिवसेनेतर्फे रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना महाविकास आघाडीचा उमेदवार घोषित करण्यात आलं. ऋतुजा लटके या महापालिकेत क्लार्क पदावर कार्यरत असल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागतोय. मात्र पालिकेतील अधिकाऱ्यांकडून हा राजीनामा मंजूर करण्यात येत नाहीये.

हे प्रकरण कोर्टात गेलंय. शिंदे गट आणि भाजप राजीनामा रोखण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचं घाणेरडं राजकारण करतंय, असा आरोप शिवसेनेतर्फे करण्यात येतोय. पण ऋतुजा लटके यांना उमेदवारी न मिळणं शिंदे गटासाठी फायद्याचं की तोट्याचं? असा विचार आणखी गुंता वाढवणारा ठरतोय…

फायदा की तोटा?

1. म्हणजे बघा, ऋतुजा लटके यांना उद्धव ठाकरे गटातर्फे उमेदवारी मिळाली तर अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेचा विजय होण्याची दाट शक्यता आहे. कारण एक तर उद्धव ठाकरेंच्या सद्यस्थितीबद्दल सहानुभूती. त्यातच रमेश लटके यांच्या विधवा पत्नी असल्याने ऋतुजा लटके यांच्याबद्दल सहानुभूतीचा फायदा ठाकरेंना होईल. त्यामुळे ऋतुजा लटकेंची उमेदवारी शिंदे गटासाठी तोट्याचीच समजली जातेय.

2. शिवसेना आरोप करतेय, त्यानुसार खऱंच ऋतुजा लटकेंच्या उमेदवारीत शिंदे गटाकडून खोडा घालण्यात येत असेल तर हेसुद्धा सत्ताधाऱ्यांसाठी विशेषतः शिंदेंसाठी धोकादायक आहे. शिंदे गटाने आतापर्यंत बंडाची अनेक कारणं दिली. हिंदुत्व, खंजीर, उद्धव ठाकरेंची कार्यपद्धती आदी कारणं देऊन भाजपसोबत सत्तेत आले. पण आता सत्ता-महत्ता सर्वकाही असताना शिंदे गटाच्या खेळीकडे जनतेचं लक्ष आहे. सत्तेत असतानाही शिवसेनेच्या वाटेत खोडा घालणं, हे जनतेलाही रुचणारं नाही. ज्याचा परिणाम शिंदे गटाला आगामी निवडणुकीत भोगावा लागू शकतो.

भाजपतर्फे मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्याची आधी चर्चा होती. पण अद्याप याची घोषणा झालेली नाही. आता ऐनवेळी शिंदे गटातर्फे मुरजी पटेल उमेदवारी अर्ज भरतील, अशीही चर्चा सुरु आहे. कारण अंधेरी निवडणुकीसाठीच पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव निवडणूक आयोगामार्फत स्पष्ट करण्यात यावं, अशी घाई शिंदे गटाकडून करण्यात आली. ऋतुजा लटकेंना शिंदे गट आपल्याकडे खेचतोय, अशीही चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. एकूणच राजकारण करता करता अंधेरीतील उमेदवारी हा शिंदे गटासाठी डोकेदुखीच ठरल्याचं दिसून येतंय.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...