AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजोबांनी 54 वर्ष राखलेला गड नातवाने गमावला

सांगोल्यात शिवसेनेचे उमेदवार शहाजी बापू पाटील यांना 99 हजार 464 मतं मिळाली, तर अनिकेत देशमुख यांना 98 हजार 696 मतं पडली

आजोबांनी 54 वर्ष राखलेला गड नातवाने गमावला
| Updated on: Oct 25, 2019 | 12:32 PM
Share

पंढरपूर : तब्बल अकरा वेळा आमदार होण्याचा मान मिळवत विश्वविक्रम रचणाऱ्या 94 वर्षीय गणपतराव देशमुख यांचा गड राखण्यात नातू अनिकेत देशमुख यांना अपयश (Aniket Deshmukh lost in Sangola) आलं आहे. सांगोला मतदारसंघातून शेकापच्या तिकीटावर निवडणुकीत उतरलेल्या अनिकेत देशमुखांना मतदारांनी नाकारलं.

सांगोल्यातून शिवसेनेचे उमेदवार शहाजी बापू पाटील यांनी बाजी मारली आहे. गेली 54 वर्ष सांगोल्याचं नेतृत्व करणाऱ्या गणपतराव देशमुख यांना निवडणुकीत उतरण्याचं आवाहन जनतेने केलं होतं. मात्र देशमुखांनी समर्थकांचा आग्रह मोडत निवडणुकीत न उतरण्याच्या भूमिकेवर ठाम राहणं पसंत केलं.

शेतकरी कामगार पक्षाने गणपतरावांच्या ऐवजी नातू डॉ. अनिकेत देशमुख यांना तिकीट दिलं. या घराणेशाहीमुळे शेकापच्या काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं वातावरणही होतं. याचाच फटका अखेर अनिकेत देशमुख यांना (Aniket Deshmukh lost in Sangola) बसल्याचं दिसत आहे.

शिवसेनेचे उमेदवार शहाजी बापू पाटील यांना 99 हजार 464 मतं मिळाली, तर अनिकेत देशमुख यांना 98 हजार 696 मतं पडली. त्यामुळे अनिकेत देशमुख यांना या अटीतटीच्या लढतीत 768 मतांच्या फरकामुळे निसटता पराभव स्वीकारावा लागला. विशेष म्हणजे ‘नोटा’ला 700 मतं मिळाली. एकूण 20 उमेदवार सांगोल्याच्या रिंगणात उतरले होते.

गणपतराव देशमुख यांनी 2014 मधील सांगोला विधानसभा निवडणुकीत 94 हजार 374 मतं मिळवत एकहाती विजय साकारला होता.

Maharashtra Assembly 2019 Big Fights | धाकधूक वाढवणाऱ्या 40 मोठ्या लढतींचा निकाल

देशमुख 1962 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. 1972 आणि 1995 चा अपवाद वगळता, ते सातत्याने विजयी झाले आहेत. गणपतरावांच्या या विजयामुळे शेतकरी कामगार पक्षाची ताकद सांगोला मतदारसंघात वाढली होती (Aniket Deshmukh lost in Sangola).

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी दहा वेळा विजयी झाले होते. 2009 च्या निवडणुकीत विजय मिळवून करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख (Sangola MLA Ganpatrao Deshmukh) हे देशातले दुसरे आमदार ठरले होते. 2014 मध्ये त्यांनी हा विक्रम मोडित एकमेवाद्वितीय होण्याचा मान पटकावला.

अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतरावांनी तब्बल 54 वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले आहे. 2012 मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सभागृहाने तसेच सरकारने त्यांचा गौरव केला होता.

गणपतराव देशमुख हे बहुतांश काळ विरोधी बाकांवरच होते, मात्र 1978 मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापले तेव्हा आणि 1999 मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हा, अशा दोन वेळा गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता.

1962 पासून आमदार, गणपतराव देशमुख यंदा निवडणूक लढवणार नाहीत

एक पक्ष एक व्यक्ती एक मतदारसंघ म्हणून सांगोला विधानसभा मतदारसंघाला ओळखले जाते. सांगोला विधानसभा मतदारसंघांमध्ये धनगर समाजाची मतदार संख्या सर्वाधिक आहे. यानंतर मराठा समाज या भागात आहे. यामुळे गणपतराव देशमुख यांना निवडून येणे अधिक सोपं जात होते. परंतु यंदा मतदारांनी शिवसेनेला कौल (Aniket Deshmukh lost in Sangola) दिला.

इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.