1962 पासून आमदार, गणपतराव देशमुख यंदा निवडणूक लढवणार नाहीत

1962 पासून आमदार, गणपतराव देशमुख यंदा निवडणूक लढवणार नाहीत

तब्बल अकरा वेळा सांगोला विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले सोलापूर जिल्ह्यातील आमदार गणपतराव देशमुख यांनी यंदाची विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Namrata Patil

|

Jul 29, 2019 | 4:09 PM

सोलापूर : तब्बल अकरा वेळा सांगोला विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले सोलापूर जिल्ह्यातील आमदार गणपतराव देशमुख यांनी यंदाची विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकृती अस्वास्थाच्या कारणामुळे मी विधानसभा लढवणार नसल्याचे नुकतंच त्यांनी स्पष्ट केले आहे.

अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतरावांनी तब्बल 54 वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकृती अस्वास्थाच्या कारणामुळे मी हा निर्णय घेत असल्याचे देशमुखांनी सांगितले आहे.  सांगोला तालुक्यातील कोळा येथील कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी याबाबत घोषणा केली आहे. दरम्यान शेकापचा बाल्लेकिल्ला अभेद्य ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी या निमित्ताने स्पष्ट केले आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी 94 हजार 374 मते मिळवून शिवसेनेचे शहाजीबापू पाटील यांचा पराभव केला होता.

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागेल आहेत. त्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत. त्यात काही वरिष्ठ नेत्यांच्या मतदारसंघासाठी चाचपणीही सुरु झाली आहे. तसेच पक्षातील कार्यकर्त्यांना जोमाने काम करण्याचेही आदेश वरिष्ठ नेत्यांनी दिले आहेत. त्यामुळे यंदाच्या विधानसभेसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे.

कोण आहेत गणपतराव देशमुख?

गणपतराव देशमुख यांचा जन्म 10 ऑगस्ट 1926 रोजी झाला.  गणपतराव देशमुख हे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार आहेत.1962 ला त्यांनी सांगोल्यातून सर्वप्रथम निवडणूक लढली होती. त्यानंतर 1972 आणि 1995 चा अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत सांगोल्यातील मतदारांनी त्यांना भरभरुन मतांनी विजयी केलं आहे. विशेष म्हणजे 2012 मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास 50 वर्षे पूर्ण झाल्याने सभागृहासह सरकारनेही त्यांचा गौरव केला होता.

महाराष्ट्रातील सर्वात वयस्कर आमदार म्हणूनही गणपतराव देशमुख यांची ओळख आहे. त्यांचे सध्या वय 94 आहे. सलग अकरा वेळा निवडून विधानसभेवर निवडून येण्याचा विक्रमाचीही देशमुख यांच्या नावे नोंद आहे.

गणपतराव देशमुख हे बहुतांश काळ विरोधी बाकांवरच होते, मात्र 1978 मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापले त्यावेळी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. त्यानंतर 1999 मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हाही गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें