AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानसभेसाठी शिवसेना शिंदे गटाचे मिशन “ताई, माई, अक्का”, पहिल्या मेळाव्याचे ठिकाणही ठरले

विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहे. त्यामुळे या मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेना राज्यातील घराघरात पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

विधानसभेसाठी शिवसेना शिंदे गटाचे मिशन ताई, माई, अक्का, पहिल्या मेळाव्याचे ठिकाणही ठरले
| Updated on: Aug 01, 2024 | 10:59 AM
Share

Assembly election 2024 Shivsena Mahila Melava : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. भाजप, काँग्रेस, शिवसेना एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पावर गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट,राष्ट्रवादी शरद पवार गट आणि मनसेकडून या सर्वच पक्षांकडून विधानसभेसाठी चाचपणी सुरु झाली आहे. त्यातच आता विधानसभा निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना सुरु करण्यात आल्या आहेत. त्यातच आता विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाने “ताई, माई, अक्का” हे मिशन सुरु केले आहे.

शिवसेनेचे ताई, माई, अक्का मिशन सुरु 

येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून महिला व्होट बँकवर विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून ताई, माई, अक्का हे मिशन ठेवण्यात आले आहे. याद्वारे महिला मतदारांना आकर्षित केले जाणार आहे. त्यासोबतच मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी राज्यभरातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका पातळीवर महिलांचे मेळावे घ्यावेत, असे आदेशही देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद

सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहिण या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेसाठी आतापर्यंत 1 कोटी 80 लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. या योजनेचा प्रसार आणि प्रचार मोठ्या प्रमाणात करण्यात यावा, अशी सूचना शिवसेनेच्या सर्व जिल्हाप्रमुखांना देण्यात आली आहे.

पहिल्या महिला मेळाव्याचे ठिकाण ठरले?

याच पार्श्वभूमीवर राज्यात शिवसेनेचा पहिला महिला मेळावा सिल्लोडमध्ये होणार आहे. त्यानंतर प्रत्येक जिल्हा आणि तालुका स्तरावर महिला मेळाव्यांचे आयोजन केले जाणार आहे. विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहे. त्यामुळे या मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेना राज्यातील घराघरात पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

एकनाथ शिंदेंकडून मतदारसंघांचा आढावा सुरु

दरम्यान काही दिवसांपूर्वी शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून राज्यातील 100 विधानसभा मतदारसंघात आढावा घेतला जात आहे. एकनाथ शिंदेंनी विधानसभा मतदारसंघातील निरीक्षकांची यादीच जाहीर केली आहे. या निरीक्षकांना संबंधित विधानसभा मतदारसंघात पाठवण्यात येणार आहे. यानुसार मतदारसंघाचा अहवाल घेतला जाणार आहे. यानंतर कोणत्या मतदारसंघात पक्षाचं स्थान बळकट आहे, उमेदवाराला पसंती आहे, याची माहिती होईल. त्यानंतर अंतिम निर्णय होईल.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.