‘मुंडे, मलिकांच्या प्रतापावर सामनामध्ये अग्रलेख पाडा की’, अतुल भातखळकरांचा राऊतांना जोरदार टोला

धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांच्या जावई प्रकरणात महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. हीच वेळ साधत अतुल भातखळकर यांनी ट्विटरद्वारे राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

'मुंडे, मलिकांच्या प्रतापावर सामनामध्ये अग्रलेख पाडा की', अतुल भातखळकरांचा राऊतांना जोरदार टोला

मुंबई: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचा आरोप आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नबाव मलिक यांच्या जावयाचं ड्रग्ज प्रकरणातील नाव, यावरुन भाजप नेत्यांनी राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. त्यात आता आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेचे खासदार आणि सामना दैनिकाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना जोरदार टोला लगावला आहे.(Atul Bhatkhalkar criticizes Shiv Sena MP Sanjay Raut )

संजय राऊत यांनी गेल्या काही दिवसांत सामनातील अग्रलेखातून दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन केंद्र सरकार आणि पर्यायानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मात्र, आता धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांच्या जावई प्रकरणात महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. हीच वेळ साधत अतुल भातखळकर यांनी ट्विटरद्वारे राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “मुंडे आणि मलिकांच्या प्रतापावर सामनामध्ये एखादा अग्रलेख पाडा की, जोरदार समर्थन करा आणि केंद्र सरकार कसं दोशी आहे हेही सांगा. लोक आतुरतेने वाट पाहत आहेत”, अशा शब्दात भातखळकर यांनी राऊतांना टोला हाणलाय.

नवाब मलिकांवर निशाणा

ड्रग्ज प्रकरणात नवाब मलिक यांच्या जावयाचं नाव आल्यानंतर भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. “नबाब मलिक यांच्या जावयाला अंमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी अटक. हे राष्ट्रवादीचे नेते घरात उकिरडा माजलाय आणि जगाला शहाणपण शिकवतात. नबाब मलिक इतके वाह्यात कसे बोलतात हे लक्षात आलं का?”, असा सवाल भातखळकर यांनी विचारला आहे.

‘जावयाच्या गुन्ह्याची शिक्षा सासऱ्याला का?’

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नवाब मलिक यांच्या जावयावर एनसीबीकडून करण्यात आलेल्या कारवाईविषयी भाष्य केलं आहे. नवाब मलिक यांच्या जावयाने गुन्हा केला असेल तर त्याची चौकशी केली जाईल. यामध्ये राज्य सरकारकडून कोणताही हस्तक्षेप केला जाणार नाही. मात्र, जावयाच्या गुन्ह्यासाठी सासऱ्याला जबाबदार धरणे योग्य नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले.

संबंधित बातम्या:

राजकारण्यांनी भान ठेवावं, धनंजय मुंडे प्रकरणात संजय राऊतांचं भाष्य

ना पोलीस, ना सुरक्षारक्षकांचा ताफा, धनंजय मुंडे भल्या पहाटे एकटेच चित्रकूट बंगल्यावर

Atul Bhatkhalkar criticizes Shiv Sena MP Sanjay Raut

Published On - 1:18 pm, Thu, 14 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI