हिंदू शब्द वगळल्याने भाजप आक्रमक, ‘परीक्षा फॉर्ममध्ये उल्लेख करा अन्यथा…’

ठाकरे सरकारने हिंदू शब्दावरच फुली मारली आहे. सरकारला हिंदू शब्दाचे वावडे आहे, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली. (Atul Bhatkhalkar Thackeray Hindu)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:45 PM, 3 Dec 2020
Atul Bhatkhalkar Thackeray Hindu

मुंबई : दहावी आणि बारावीच्या परीक्षा फॉर्ममध्ये हिंदू शब्द वगळल्याने भाजप नेते आक्रमक झाले आहेत. “ठाकरे सरकारने हिंदू शब्दावरच फुली मारली आहे. सरकारला हिंदू शब्दाचे वावडे आहे,” असा आरोप मुंबई भाजपचे प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर केला. (Atul Bhatkhalkar criticizes Thackeray government over Hindu religion)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात येत आहेत. या परीक्षा फॉर्मममध्ये धर्माच्या रकाण्यात हिंदू शब्द वगळण्यात आला आहे. त्याऐवजी अल्पसंख्याकेतर (नॉन-मायनॉरिटी) असा उल्लेख केल्याचा आरोप अतूल भातखळकर यांनी केला आहे. याच मुद्द्याला घेऊन त्यांनी ठाकरे सरकारला घेरले आहे.

“राज्यात मंदिरे सुरु करण्यासाठी तब्बल सहा महिने उशीर झाला. आषाढी वारीसाठी देण्यात आलेल्या बसेसच्या बदल्यात भाडे आकारण्यात आले. राज्यात हिंदूंच्या साधूंचे हत्याकांड झाले. या हत्याकांडातील आरोपींविरोधात कारवाई करण्यात आलेली नाही. त्यानंतर आता ठाकरे सरकारने हिंदू शब्द वगळला आहे,” असं भातखळकर म्हणाले.  तसेच, ठाकरे सरकार काहींना खूश करण्यासाठी आणि आपली मतपेटी सांभाळण्यासाठी सतत हिंदूविरोधी निर्णय घेत आहे, असा आरोपही भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर ट्विटरच्या माध्यमातून केला.

हिंदू शब्दाचा उल्लेख करा

दरम्यान, दहावी तसेच बारावीचे परीक्षा फॉर्म मागे घ्यावेत. तसेच सरकारने या फॉर्ममध्ये हिंदू धर्माचा उल्लेख करावा, अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे. तसेच, ठाकरे सरकारने ही मागणी मान्य केली नाही, तर भाजप याविरोधात तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.


संबंधित बातम्या :

नावातच U आणि T असल्यामुळे हे सरकार युटर्न घेणारच, अतुल भातखळकरांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

मुख्यमंत्री घरी बसलेले असतील तर राज्य धोक्याच्या वळणावरच; अतुल भातखळकरांचा टोला

दारुच्या दुकानांमुळे नाही तर मंदिरं उघडल्यामुळे रुग्ण वाढले, महारापौरांचा तर्कट, हा शिवसेनेचा खरा चेहरा : अतुल भातखळकर

(Atul Bhatkhalkar criticizes Thackeray government over Hindu religion)