आधी नारायण राणेंकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन, आता शिवसैनिकांकडून शुद्धीकरण!

नारायण राणे यांनी आज आपल्या जन-आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. तत्पूर्वी त्यांनी शिवाजी पार्क इथं जात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेत अभिवादन केलं. त्यानंतर संध्याकाळी काही शिवसैनिकांकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण करण्यात आलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर गोमुत्रा शिंपडून, दुधाचा अभिषेक शिवसैनिकांनी घातला.

आधी नारायण राणेंकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन, आता शिवसैनिकांकडून शुद्धीकरण!
Narayan Rane_Balasaheb Thackeray


मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज आपल्या जन-आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. तत्पूर्वी त्यांनी शिवाजी पार्क इथं जात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेत अभिवादन केलं. त्यानंतर संध्याकाळी काही शिवसैनिकांकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण करण्यात आलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर गोमुत्रा शिंपडून, दुधाचा अभिषेक शिवसैनिकांनी घातला. दुपारी नारायण राणे यांनी स्मृतीस्थळावर आले होते. त्यामुळे हा परिसर अशुद्ध झाला, असं या शिवसैनिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे संध्याकाळी काही शिवसैनिकांकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. (Purification of balasaheb Thackeray’s memorial by ShivSainiks after Narayan Rane pays homage)

आप्पा पाटील नावाच्या शिवसैनिकाने बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर गोमुत्र शिंपडून आणि दूधाचा अभिषेक घालून शुद्धीकरण केलं. आप्पा पाटील हे आपल्या दिवसाची सुरुवात बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर वंदन करुन आणि फुलं वाहून करतात. त्यानंतरच ते आपल्या कामाला सुरुवात करतात. केंद्रीय मंत्री नारायण राणे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेत अभिवादन केलं होतं. त्यानंतर संध्याकाळी कट्टक शिवसैनिकांनी स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

‘बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या कुणालाही हे आवडणार नाही’

विनाशकाळे विपरीत बुद्धी…खरं तर नारायण राणे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर दर्शनासाठी आले असता विरोध होता कामा नये. नारायण राणे हे बाळासाहेबांच्या हाताखाली घडलेला कार्यकर्ता आहेत. बाळासाहेब हयात असते तर त्यांनाही आनंदच झाला असता. मला वाटतं अशा प्रकारच्या मानसिकतेमुळं शिवसेना सहानुभूती मिळवण्यापेक्षा सहानुभूती गमावत आहे. अशी कृती सर्वसामान्य माणसाला किंवा बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या माणसाला आवडणार नाही. बाळासाहेब हे काही कुणाची खासगी मालमत्ता राहिलेले नाहीत. ज्याला आपण दैवत मानतो त्या व्यक्तीला तुम्ही विभागू शकत नाही. शिवसैनिकांची ही कृती योग्य नाही, अशी प्रतिक्रिया प्रविण दरेकर यांनी दिली आहे.

शिवसेनेचंच शुद्धीकरण करण्याची गरज – शेलार

शिवसेनेला शुद्धीकरण करण्यासाठी शुद्ध अस्तित्व आणि अधिष्ठान आहे का? असा सवाल भाजप आमदार आशिष शेलार यांनी विचारलाय. कारण, सत्तेच्या लालसेपोटी ज्यांनी सोनिया गांधी यांच्या नावाने शपथ घेऊन काँग्रेसबरोबर सलगी केली, त्या शिवसेनेचंच मुळात शुद्धीकरण करण्याची गरज आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना ज्या छगन भुजबळांनी जेलमध्ये टाकलं त्यांच्याशी सत्तेसाठी सलगी करणाऱ्या शिवसेनेचंच शुद्धीकरण करण्याची गरज असल्याचा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.

नारायण राणे काय म्हणाले?

मी माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासमोर नतमस्तक झालो, नमस्कार केला आणि सांगितलं साहेब तुम्ही आज हवे होते, मला आशीर्वाद देण्यासाठी. मला जे काही मिळालं ते साहेबांमुळे. मला साहेबांनीच घडवलंय, आजही ते असते तर म्हणाले असते नारायण तू असेच यश मिळव, माझा आशिर्वाद आहे.आणि डोक्यावर हात ठेवला असता. आज हात डोक्यावर नसला तरी साहेबांचे आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहेत. त्यामुळे कुणाही दैवताचं स्मारक असो, तिथे विरोधाची भाषा करु नये, भावनांचा विचार करावा, त्यानंतर वक्तव्य करावं, असा सल्ला नारायण राणे यांनी दिला.

संबंधित बातम्या :

32 वर्षांचा पापाचा घडा फोडणार, बाळासाहेबही म्हणाले असते, नारायण अशीच प्रगती कर : नारायण राणे

VIDEO | दिल्लीत कोकणाची आठवण येते का, नीलम राणे म्हणतात आम्ही ‘तिथून’ मासे मागवतो

Purification of balasaheb Thackeray’s memorial by ShivSainiks after Narayan Rane pays homage

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI