‘ढवळ्या शेजारी पवळा बांधला’, बंडातात्यांकडून ठाकरेंचं कौतुक तर अजितदादांना टोला!

बंडातात्या कराडकर यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलंय. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. तर बंडातात्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही आपल्या एका वक्तव्यातून जोरदार टोला लगावलाय. 'ढवळ्या शेजारी पवळा बांधा, वाण नाही पण गुण लागला' या म्हणीचा वापर करत त्यांनी अजितदादांना ढवळ्याची, तर उद्धव ठाकरे यांना पवळाची उपमा दिली आहे.

'ढवळ्या शेजारी पवळा बांधला', बंडातात्यांकडून ठाकरेंचं कौतुक तर अजितदादांना टोला!
बंडातात्या कराडकर, उद्धव ठाकरे, अजित पवार
Follow us
| Updated on: Feb 03, 2022 | 8:37 PM

सातारा : प्रसिद्ध कीर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) आपल्या वक्तव्यानं पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. बंडातात्या यांनी आज दोन वक्तव्य केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याबाबत बंडातात्या यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलंय. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. तर बंडातात्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनाही आपल्या एका वक्तव्यातून जोरदार टोला लगावलाय. ‘ढवळ्या शेजारी पवळा बांधा, वाण नाही पण गुण लागला’ या म्हणीचा वापर करत त्यांनी अजितदादांना ढवळ्याची, तर उद्धव ठाकरे यांना पवळाची उपमा दिली आहे.

नेमकं काय म्हणाले बंडातात्या?

‘एक म्हण आहे, ढवळ्या शेजारी पवळा बांधला… पुढं काय, वाण नाही पण गुण लागला. उद्धव ठाकरे चांगला आहे ओ… उद्धव ठाकरे चांगला माणूस आहे. बाळासाहेब ठाकरे, असा एक हिंदुत्वाता पुरस्कर्ता, हिंदूहृदयसम्राट अशी ज्यांची पदवी होती, ज्यांना हिंदू समाजानं डोक्यावर घेतलं. असा एका हिंदुत्ववादी पुढाऱ्याचा मुलगा आहे उद्धव ठाकरे. अशी दारु आणावी, मंदिरं बंद करावी, सप्ते बंद करावे, वारी बंद करावी, अशा विचाराचा पुढारी नाही उद्धव ठाकरे. पण ते ढवळ्या शेजारी पवळा बांधला ना… ढवळा कोण तुमच्या लक्षात आलं असेल. अजितदादा ढवळा आणि त्याच्या शेजारी नेऊन हा पवळा बांधला’, अशा शब्दात बंडातात्या कराडकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लागावला आहे.

सुप्रिया सुळे, पंकजा मुंडेंबाबत बंडातात्यांचं आक्षेपार्ह वक्तव्य काय?

बंडातात्या कराडकर यांच्या या वक्तव्यावर आता राज्यभरात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपसह सर्वच पक्षाच्या महिला नेत्यांनी बंडातात्या यांच्यावर जोरदार टीका केलीय. तसंच त्यांनी माफी मागावी अशी मागणीही करण्यात येत आहे. सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे दारु पितात, असं वक्तव्य बंडातात्या यांनी केलं होतं. त्याबाबत पत्रकारांनी विचारलं असता हे आपण पुराव्यानिशी सिद्ध करु शकतो, असंही बंडातात्या पुढे जाऊन म्हणाले.

‘माफी मागायला तयार, आता विषय संपवा’

दरम्यान, बंडातात्या कराडकर यांनी सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांना फोन करुन माफी मागितल्याची माहिती मिळत आहे. तसंच आपल्या वक्तव्याचे माध्यमामध्ये जोरदार पडसाद उमटल्यानंतर आपण माफी मागायला तयार आहोत, पण आता हा विषय संपवा, असं बंडातात्या म्हणाले. मी फक्त एवढंच बोललो नाही. मात्र, माध्यमांमध्ये माझं तेवढंच वक्तव्य दाखवण्यात आलं. आपण चुकलो असू तर माफी मागण्यात कमीपणा नसतो, असं म्हणत बंडातात्या यांनी दिलगिरी व्यक्त केलीय.

इतर बातम्या :

पुन्हा अमृता फडणवीसांच्या ट्विटवरून महिला नेत्यांची जुंपली, रुपाली पाटील-श्वेता महाले आमनेसामने

Breaking : उत्तर प्रदेशात असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार! ओवेसी सुखरुप

‘महापालिकेत 20 वर्षे सत्ता, पण रस्त्यावर गाडी व्हायब्रेट मोडवर जाते’, मुंबई महापालिका अर्थसंकल्पावरुन मुनगंटीवारांचा शिवसेनेवर निशाणा

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.