Photo : खासदार सुप्रिया सुळेंच्या पुढाकारातून 12 दिव्यांग जोडप्यांचा विवाह सोहळा

पुणे येथील मार्केट यार्ड परिसरातील एका मंगलकार्यलयात या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सर्व 12 जोडप्यांचा हळदी समारंभ व अन्य विधी संपल्यानंतर प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे सामूहिक पूजन करून सर्व नवदाम्पत्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. या सोहळ्यादरम्यान कोविड विषयक नियमांचेही पालन करण्यात आले.

1/7
खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून पुणे येथे 12 दिव्यांग जोडप्यांच्या अनोखा विवाह सोहळा पार पडला. सुप्रिया सुळे यांनी आपल्या प्रास्ताविकात धनंजय मुंडे यांना सूचना केली होती. त्यानुसार या ऑनलाईन सोहळ्यातच धनंजय मुंडे यांनी दिव्यांग जोडप्यांच्या विवाहासाठी अर्थसहाय्य योजनेबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचं सांगितलं

2/7
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, अपंग हक्क विकास मंच, पवार चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई, महात्मा गांधी सेवा संघ संचालित दिव्यांग पुनर्वसन केंद्र पुणे यांच्या वतीने व सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून प्रथमच आयोजित केल्या गेलेल्या 12 दिव्यांग जोडप्यांच्या अनोख्या सामुदायिक विवाह सोहळा पार पडला.

3/7
या विवाह सोहळ्याला धनंजय मुंडे, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे व स्वतः सुप्रिया सुळे यांसह मान्यवर उपस्थित होते. स्वतः कोविड बाधित आहेत. असं असतानाही दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात लग्न सोहळा अनुभूती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या सुप्रिया सुळे यांच्या कार्य व इच्छा शक्तीचे कुतूहल व आदर वाटतो, असे धनंजय मुंडे आणि राजेश टोपे म्हणाले.

4/7
धनु भाऊ आणि राजेश भैय्या या दोघांच्या सहकार्याशिवाय हा लग्न सोहळा होऊच शकला नसता. हा सामुदायिक विवाह सोहळा हा केवळ एक टप्पा असून पुढे अशा प्रकारचे कार्यक्रम राज्यभरात राबवायचे आहेत, असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

5/7
सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने शरद पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त 12 डिसेंबर 2021 ते 12 मार्च 2022 या दरम्यान दिव्यांग व्यक्तींची नोंदणी करून त्यांना आवश्यक असलेले वैश्विक ओळखपत्र (UDID Card) देण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

6/7
पुणे येथील मार्केट यार्ड परिसरातील एका मंगलकार्यलयात या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सर्व 12 जोडप्यांचा हळदी समारंभ व अन्य विधी संपल्यानंतर प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे सामूहिक पूजन करून सर्व नवदाम्पत्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. या सोहळ्यादरम्यान कोविड विषयक नियमांचेही पालन करण्यात आले.
पुणे येथील मार्केट यार्ड परिसरातील एका मंगलकार्यलयात या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सर्व 12 जोडप्यांचा हळदी समारंभ व अन्य विधी संपल्यानंतर प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे सामूहिक पूजन करून सर्व नवदाम्पत्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. या सोहळ्यादरम्यान कोविड विषयक नियमांचेही पालन करण्यात आले.
7/7
त्यानंतर सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या व विधिवत सनई चौघड्यांच्या स्वरात हा अनोखा विवाह सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी विशेष प्रयत्न केलेले यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणचे विजय कान्हेकर, अभिजित राऊत, दिपिका शेरखाने तसेच सर्वच आयोजकांचे उत्कृष्ट नियोजनाबद्दल सर्वांनीच कौतुक केले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI