AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारामतीत अजित पवारांचा डंका, पडळकरांसह सर्वांचंच डिपॉझिट जप्त

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचं बारामतीतील आव्हान (Ajit Pawar on BJP Challenge) मोडीत काढलं आहे.

बारामतीत अजित पवारांचा डंका, पडळकरांसह सर्वांचंच डिपॉझिट जप्त
| Updated on: Oct 24, 2019 | 5:05 PM
Share

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचं बारामतीतील आव्हान (Ajit Pawar on BJP Challenge) मोडीत काढलं आहे. भाजपने बारामतीतून (Baramati Assembly Election result) अजित पवार यांच्याविरोधात गोपीचंद पडळकर (Ajit Pawar Vs Gopichand Padalkar) यांना उतरवलं होतं. मात्र, अजित पवारांनी गोपीचंद पडळकर यांच्यासह उर्वरित सर्वच उमेदवारांचा दारुण पराभव केला. पडळकरांसह सर्वच उमेदवारांचं अगदी डिपॉझिट देखील जप्त झालं आहे.

अजित पवार यांना एकूण 1 लाख 95 हजार 641 मते मिळाली. तर भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना केवळ 30 हजार 376 मते मिळाली. अशाप्रकारे अजित पवार तब्बल 1,65,265 मताधिक्याने विजयी झाले. एकूण 28 फेऱ्यांमध्ये बारामती विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी झाली. विशेष म्हणजे भाजपने अजित पवारांना आपल्या होम ग्राऊंडवर घेरण्याचा प्रयत्न केला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी अजित पवारांचा पराभव करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंत अजित पवारांनीही हे आव्हान स्वीकारत चंद्रकांत पाटलांसह सर्वांचेच बारामतीतून लढण्यासाठी स्वागत केले होते. तसेच बारामतीतून 1 लाख मताधिक्याने निवडून येणार असल्याचा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला होता. तो या निकालातून खरा ठरला आहे.

बारामती विधानसभा मतदारसंघातील उमेदवार

  • अजित पवार – राष्ट्रवादी काँग्रेस
  • गोपीचंद पडळकर – भाजप
  • अविनाश गोफणे – वंचित बहुजन आघाडी
  • अशोक माने – बहुजन समाज पक्ष
  • विनोद चांगगुडे – राष्ट्रीय जनक्रांती पक्ष
  • सचिन आगवणे – अपक्ष
  • दादा थोरात – अपक्ष
  • बापू भिसे – अपक्ष
  • मधूकर मोरे – अपक्ष
  • राहुल थोरात – अपक्ष

भाजपने लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत देखील पवार कुटुंबाला त्यांच्या बालेकिल्ल्यातच आव्हान देण्याचं ठरवलं होतं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बारामती जिंकणार असल्याचा दावा केला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः बारामतीतून भाजपचे उमेदवार म्हणून धनगर नेते गोपीचंद पडळकरांच्या नावाची घोषणा केली होती. त्यामुळे यावेळी बारामती विधानसभा निवडणूक चांगलची चुरशीची होणार असल्याचं बोललं गेलं. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या निकालावरुन ही लढत एकतर्फीच झाल्याचं दिसत आहे.

अजित पवार म्हणाले होते, “मतदार यादीत नाव आलं की भारतीय संविधानानुसार कुणालाही कोठूनही लढता येतं. त्यामुळे कुणीही बारामतीतून उभं राहिलं तरी हरकत नाही. ज्याला बारातमीतून लढायचं आहे त्याचं स्वागत. आम्ही प्रत्येकवेळी लढताना समोर तुल्यबळ उमेदवार आहे असं समजूनच लढत असतो. त्यामुळे बारामतीतून राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ज्याला उमेदवारी देतील त्याच्यासाठी पूर्ण ताकदीनिशी लढू. बारामतीतून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आणू.”

‘काट्याने काटा काढणार, सुरुवात त्यांनी केली आता तेच घडणार’

अजित पवार यांनी त्यावेळी फोडाफोडीच्या राजकारणावरही भाष्य केलं होतं. ते म्हणाले होते, “काट्याने काटा काढायचा असतो. याची सुरुवात त्यांनी केली. आता तेच घडेल. यापुढे फोडाफोडी होईल. आघाडी विधानसभा निवडणुकीत 175 हून अधिक जागा जिंकेल.

पुणे जिल्ह्यात विधानसभेचे 21 मतदारसंघ आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने तब्बल 11 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या या गडाला अक्षरश: सुरुंग लावला होता. 2019 च्या निवडणुकीत वातावरण बदललं असल्याचं दिसत आहे.

महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.