AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परळीत मनसे-भाजप कार्यकर्ते भिडले, पंकजांच्या घरासमोरील आंदोलनाआधी राडा

पन्नगेश्वर साखर कारखान्याकडून ऊसतोड मजुरांचे 'एफआरपी'चे बिल थकल्यामुळे मनसेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता

परळीत मनसे-भाजप कार्यकर्ते भिडले, पंकजांच्या घरासमोरील आंदोलनाआधी राडा
| Updated on: Feb 17, 2020 | 2:05 PM
Share

बीड : बीडमधील परळीत भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरासमोर मनसे आंदोलन करण्याच्या तयारीत असतानाच राडा (Beed MNS BJP Ruckus) झाला.

पन्नगेश्वर साखर कारखान्याकडून ऊसतोड मजुरांचे ‘एफआरपी’चे बिल थकल्यामुळे मनसेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. कारखान्याच्या संचालिका पंकजा मुंडे यांच्या परळीतील ‘यशश्री’ निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याची हाक मनसेने दिली होती.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडेंच्या घराकडे धाव घेतली. मात्र पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली. त्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले. पंकजा मुंडेंच्या बंगल्याकडे जात असताना भाजप कार्यकर्तेही आक्रमक झाले.

परळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसे आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले. पोलिसांनी मध्यस्थी होऊन वाद मिटवला आणि आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक केली.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठींमुळे मनसे-भाजप युतीच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र नवी मुंबईत आयोजित भाजपच्या राज्यस्तरीय अधिवेशनात भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी स्वबळाचा नारा दिला. त्यांच्या वक्तव्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मनसेसोबत भाजपची युती होण्याची शक्यताही धूसर झाल्याचं दिसत आहे.

Beed MNS BJP Ruckus

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.