‘नवी मुंबईच्या 28 गावांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार’

नवी मुंबई : गेल्या 30 वर्षांपासून नवी मुंबईमधील विस्तारीत गावठाणाचा आणि घरांचा प्रश्न प्रलंबित आहे. कोणताही राजकीय पक्ष हे प्रश्न सोडवण्यास तयार नाही. याचा फक्त राजकारणासाठी वापर होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे. त्यामुळे नवी मुंबईच्या 28 गावांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. आगरी-कोळी यूथ फाऊंडेशनने आज पत्रकार  परिषद घेऊन ही माहिती दिली. नवी मुंबई शहर […]

‘नवी मुंबईच्या 28 गावांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार’
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

नवी मुंबई : गेल्या 30 वर्षांपासून नवी मुंबईमधील विस्तारीत गावठाणाचा आणि घरांचा प्रश्न प्रलंबित आहे. कोणताही राजकीय पक्ष हे प्रश्न सोडवण्यास तयार नाही. याचा फक्त राजकारणासाठी वापर होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे. त्यामुळे नवी मुंबईच्या 28 गावांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. आगरी-कोळी यूथ फाऊंडेशनने आज पत्रकार  परिषद घेऊन ही माहिती दिली.

नवी मुंबई शहर वसवण्यासाठी 1970 साली महानगर पालिका क्षेत्रातील 28 गावांची शेतजमीन, मोकळी जागा, गुरचरण जमीन मूळ गावठाण वगळून संपादित  केली. परंतु गेल्या 40 वर्षांमध्ये या गावांचा गावठाण विस्तार केला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी गरजेपोटी घरे बांधली. यात व्यावसायिक गाळेही आहेत. येथील ग्रामस्थांनी वर्षानुवर्षे आपली घरे अधिकृत करून त्याला प्रॉपर्टी कार्ड मिळावे, अशी मागणी केली. मात्र, प्रत्येक राजकीय पक्ष याचा फक्त राजकीय फायदा घेत आहे. घरे अधिकृत करता येऊ शकत असतानाही यात राजकारण करुन ग्रामस्थांना वेठीस धरल्याने अखरे निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय घेतल्याचे आगरी-कोळी यूथ फाऊंडेशनने सांगितले.

ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या:

  • नवी मुंबईमधील मुळ गावठाण, विस्तारीत गावठाण आणि गावठाणालगतच्या जमिनीचे सर्वेक्षण करणे.
  • जमिनीची सनद शेतकऱ्यांच्या नावावर देणे. सनद दिल्यानंतर त्यावरील बांधण्यात आलेली घरे अधिकृत करणे.
  • जी घरे नियमित होऊ शकत नाहीत, त्यांना संरक्षित करून त्यांना वाढीव एफ. एस. आय. देऊन पुनर्विकासाचा पर्याय देणे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.